जगात सगळ्या योग्य गोष्टींची
दखल घेतली जातेच असे नाही. विशेषतः स्त्री-पुरुष समानतेत आपण जरा चुकतोच !
सौ. ताराबाई मेढेकरांच्या
बाबतीत तर मला ही चूक खूपच खंत देवून जाते. संसार करताना कमावून आणणे हे जेवढे
महत्वाचे वाटते त्यापेक्षा मुलांचे संगोपन करणे, घर चालवणे हे कितीतरी जिकीरीचे
असते हे आता कोणालाही पटावे इतके उघड आहे. आणि सौ. ताराबाईनी कमावणे व घर चालवणे ही
दोन्हीही कामे यशस्वीपणे केलेली होती. पण त्यांच्या
हयातीत त्यांचे मोठेपण आपल्याला जाणवले नाही. दागो देशपांडे म्हणतात तसे हे आपले
करंटेपणच म्हटले पाहिजे.
त्याशिवाय परिस्थिती बेताची असली की आहे त्या वेळेत सर्व सहन करावे लागते.
ताराबाई जेव्हा शिकल्या व नोकरी करीत तेव्हा ते काम तसे धाडसाचेच होते व लोकांची
नाही नाही ती बोलणीही सहन करावी लागत. तशात त्यानी संसार यशस्वीपणे तर केलाच शिवाय
जी थोर माणसे भेटली ( जसे कहाळेकर महाराज वगैरे ) त्यांचाही मान राखला.
अप्पांच्या पश्चात त्या लगोलग निघून गेल्या त्यात त्यांची भावनिक धृडता दिसून
आली त्या भाव-बलाला सादर प्रणाम !
--------------------------------------------