Saturday, April 24, 2010

द भालेराव : ५
गोड साक्षात्कार !
मला नुकतीच शुगर निघाली आणि एक गोड साक्षात्कारच झाला !
प्रत्येक माणसात देवाचा अंश असतोच, असे म्हणतात, तसा प्रत्येक माणसात शुगर असतेच हे मात्र आता मला स्वानुभावाने कळले.
बाहेरून साखरेच्या असण्याचे काही प्रमाण दिसत नाही, पण तपासले तर प्रत्येकात देव आढळतोच तशी थोडी वा फार साखर निघतेच निघते.
एकदा का हा दैवी साक्षात्कार झाला की मग गोडी कमी झाली तर चालत नाही. म्हणजे शुगर कमी झाली की चक्कर येते तसेच देवाची गोडी कमी झाली की नाही नाही त्या फेर्‍यात (चक्करेत) माणूस पडतो.
शुगर निघाली रे निघाली की फिरणे अगदी अत्यावश्यक होते. कारण देतात, अतिरिक्त गोडी जाळण्याचे. देवाचा साक्षात्कार झाला की असेच होते. बसून न राहता सगळीकडे मिरवावे लागते.
शुगर निघाली की आपण जे एरव्ही बका बका खातो ते थांबते. कशात किती साखर आहे हे पाहणे अगदी चौकस होते. प्रत्येक पदार्थात आपण काय चांगले काय वाईट ते बघू लागतो. देवाचा साक्षात्कार झाला की सगळीकडे पाहण्य़ाची नजर अशीच विवेकाची ठेवावी लागते. कोण चांगला आहे, सत्संग कोणता, हे पाहत जगावे लागते.
जेवणानंतरची शुगर ज्यास्त असते तर सकाळी फास्टींगची कमी असते. म्हणजे साखर कमी असावी तर उपास घडला पाहिजे. ह्याच नियमावरून देवासाठी उपास तापास करण्याची परंपरा तयार झाली असावी.
देवाचा अंश आपल्यात आला की आपण कसे देवमय होऊन जातो, देवात विलीन होतो तसाच काहीसा संकेत शुगर येण्याचा असतो. म्हणजे आता शुगर आलीय तर पर्याणाचा अंतिम दिवस, गोड शेवट, फार लांब नाही हाच तो संकेत !

--अरूण भालेराव
भ्रमण :९३२४६८२७९२

2 comments:

  1. thanks for commenting on my poem on Kusumagraj. could not get a link to respond to you, that is your mail ID, hence commenting through your post. If its true that kusumagraj poem has been removed from the text book than it speaks volumes about our govt. ironically some years ago, the govt has issued an order asking all its offices to display his poem swatantryadevichi vinanvani.
    thanks and regs
    abhijit

    ReplyDelete
  2. पोटी जन्मती रोग
    तरि का म्हणावे आप्तवर्ग
    रानी वसती औषधी
    तरि का म्हणाव्या निरपराधी
    तैसे शरीराचे नाते
    तुका म्हणे सर्व आप्ते

    प्रभंजन

    ReplyDelete