द भालेराव---८
जीव-फुंकर किंवा सीपीआर
कोणाला ह्र्दयविकाराचा झटका आला असेल तर त्याला तात्काळ करावयाचा उपचार असतो सी पी आर ( कार्डिओ पल्मोनरी रिससायटेशन ) किंवा जीव-फुंकर ( हा आपला मला आवडलेला शब्द ! ). अमेरिकेसारख्या प्रगत देशात म्हणे वर्षात ३ लाख लोकांना हॉस्पीटल बाहेत ह्रदयविकाराचे झटके येऊन मरण आले ( ह्या वर्षी ). नुकत्याच केलेल्या पाहणीनुसार ह्यापैकी फक्त ६ टक्के वाचतात. जर ह्यांना नवीन प्रकारची जीव-फुंकर मिळाली तर त्यातले १२ टक्के लोक वाचतील असे अमेरिकन हार्ट असोसिएशनचे म्हणणे आहे. काय आहे ही नवीन प्रकारची जीव-फुंकर ?
झटका आलेल्याला प्रथम जमीनीवर आडवे झोपवावे ( अर्थात पालथे नव्हे, तोंड वर ) . छातीवर, मधोमध, एक हात ( तळवा, बोटे ह्रदयावर अंदाजे येतील असा, ) ठेवावा. दुसर्या हाताचा तळवा त्यावर जोर देण्यासाठी ठेवावा. मग छातीवर हाताने जोर देत दर मिनिटाला १०० भरतील इतके भरभर दाबावे. तोंडाने हवा फुंकण्याच्या भानगडीत पडू नये. ( चमकू नका. पूर्वी म्हणत की दोन वेळा पूर्ण श्वासाचे दोन फुंक द्या . पण आता असे लक्षात आले आहे की लोक हे करीत नाहीत व परिणामी छाती दाबण्याचा प्रयोगही होत नाही. तर आता नवीन आदेश हा की श्वास देण्याच्या भानगडीत पडू नका व त्याने विशेष परिणामही होत नाही असे आढळले म्हणे .).
एमर्जन्सी फोनवरून बोलणार्या माणसाने अगदी ठामपणे फोन करणार्याला ह्या सूचना द्याव्यात असेही अमेरिकन हार्ट असोसिएशनचे मत आहे.
काळाने आपली प्राण-ज्योत विझवण्याच्या आधी, चला घालूया ही नवीन जीव-फुंकर, आणीबाणीच्या वेळी !
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
the Bhalerao---8
New CPR
The news is practice a new method of CPR ( Cardiio-Pulmonary-Resuscitation ) as advised by the American Heart Association. Last year 3,10,000 people died of heart attack outside the hospital. Only 6 % of the cases survive, but with new CPR they hope 12% can be made to survive. What is this new CPR ?
First let the patient lie dowin on the floor, in a head & nose up position. Place your one hand ( palm facing down, fingers covering approximately over the heart ) at the centre of the chest. Place the second hand on the first, for giving pressure down. Press release the pushes, quickly, ( as quick as giving 100 pushes per minute ) for few times. Don't bother for blowing breaths into the mouth of the patient. ( The survey found that people were not giving CPR because of perceived complication in blowing breaths in the mouth. Hence making it simple will make the CPR being administered to more patients and survival is exected to rise to 12 % from existing 6% ).
People generally phone emergency numbers in most cases and wait for help to arrive, but the person receiving such phones is advised to instruct them, focefully, to administer the new CPR, which anybody can do on clear instructions.
As it is a matter of Life and Death, let us help keep the death away by giving timely new CPR !
Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com
Thursday, July 29, 2010
Thursday, July 22, 2010
द भालेराव-७
"वारसा"चे तत्व
पूर्वी वारसा हक्काने सर्व मिळकत फक्त मोठया मुलाला मिळे. तर कित्येक घरात मोठ्या मुलाला अमुक तमुक देवाला किंवा देवीला वाहून टाकत असत. शिखांमध्ये मोठया मुलाला सरदार व्हावेच लागे. मुसलमानांमध्ये माणसाला आपल्या मिळकतीचा काही भागच ( १/३) मृत्युपत्राद्वारे देता येतो. उरलेल्या २/३ भागातून नातेवाईकांना वारसाहक्काने मालमत्ता वाटतात. त्यात मुलाला दुप्पट भाग मिळतो तर मुलींना एक भाग. २००६ पासून हिंदू मुलींना समान वाटा मिळावा असा कायदा झाला आहे.मृत्युपत्र केलेले नसेल तर मालमत्ता समान भागात वाटतात.
समान भागाचे हे वारसाचे तत्व कसे व का अमलात आले असावे ?
मृत्युपत्रा प्रमाणे वाटणे हे त्या माणसाच्या मताप्रमाणे असल्याने ते अर्थातच त्याच्या मनाप्रमाणे असते.पण त्याच्या पश्चात वाटण्यासाठी काय रास्त प्रमाण असावे ? आपल्याकडे मेरिट म्हणजे मार्क, परीक्षा, असेच समजले जाते.पण एखाद्याची मालमत्ता वाटण्यासाठी काही परीक्षा असत नाही.मग कोणाला किती मार्क्स मिळतील त्याचा काही संबंधच रहात नाही. गरीबी श्रीमंतीवरून वाटण्या केल्या व श्रीमंतालाच परत ज्यास्त वाटा दिला तर ते गरीब वारसाला अन्यायाचे वाटणार.गरीब वारसाला ज्यास्त वाटा दिला तर दुसर्यांना ते अन्यायाचे वाटणार. जसे मृत्युपत्रात त्या माणसाची इच्छा व्यक्त केलेली असते तसे त्याच्या मृत्यू पश्चात काय योग्य हे कसे ठरवायचे ?
प्रत्येक माणसाचा दृश्य हेतू पुढे त्याच्या संततीची प्रगती व्हावी असाच असतो. कोणाची किती प्रगती होऊ शकते ह्याचे काही आडाखे आपण बांधू शकत नाही. कोणी कवी मृत्यू पावला व त्याचा अंश पुढच्या पिढीत रहावा अशी योजना करू म्हटले तर त्याच्या मुलांत कोण चांगला कवी होऊ शकतो हे पहावे लागेल.पण प्रत्यक्षात अंदाजाप्रमाणे किंवा परीक्षेप्रमाणे कोणाची प्रगती होते हे बेभरवशाचे असते. शिवाय कवी असलेल्या माणसाची धन्यता त्याची मुलेही कवी झाल्याने होते की ते डॉक्टर , इंजिनियर झाल्याने होते हे कसे व कोण ठरवणार ? एका माणसाचा डिएनए पुढच्या पिढीत काय झाल्याने प्रगत डिएनए होईल ह्याला काही अदमास नाही. मग सर्वच पुढच्या पिढीच्या डिएनए ज ना सारखे हिस्से दिले तर त्या सर्वांना सारखे प्रोत्साहन दिल्यासारखे होईल. व मग त्यातूनच कोणा तरी वारसाचा डिएनए वाढीस लागेल व मृत्यू पावलेल्या डिएनए ला धन्य वाटेल. हेच असेल समान वारसा हक्काचे तत्व ?

Subscribe to:
Posts (Atom)