द भालेराव---८
जीव-फुंकर किंवा सीपीआर
कोणाला ह्र्दयविकाराचा झटका आला असेल तर त्याला तात्काळ करावयाचा उपचार असतो सी पी आर ( कार्डिओ पल्मोनरी रिससायटेशन ) किंवा जीव-फुंकर ( हा आपला मला आवडलेला शब्द ! ). अमेरिकेसारख्या प्रगत देशात म्हणे वर्षात ३ लाख लोकांना हॉस्पीटल बाहेत ह्रदयविकाराचे झटके येऊन मरण आले ( ह्या वर्षी ). नुकत्याच केलेल्या पाहणीनुसार ह्यापैकी फक्त ६ टक्के वाचतात. जर ह्यांना नवीन प्रकारची जीव-फुंकर मिळाली तर त्यातले १२ टक्के लोक वाचतील असे अमेरिकन हार्ट असोसिएशनचे म्हणणे आहे. काय आहे ही नवीन प्रकारची जीव-फुंकर ?
झटका आलेल्याला प्रथम जमीनीवर आडवे झोपवावे ( अर्थात पालथे नव्हे, तोंड वर ) . छातीवर, मधोमध, एक हात ( तळवा, बोटे ह्रदयावर अंदाजे येतील असा, ) ठेवावा. दुसर्या हाताचा तळवा त्यावर जोर देण्यासाठी ठेवावा. मग छातीवर हाताने जोर देत दर मिनिटाला १०० भरतील इतके भरभर दाबावे. तोंडाने हवा फुंकण्याच्या भानगडीत पडू नये. ( चमकू नका. पूर्वी म्हणत की दोन वेळा पूर्ण श्वासाचे दोन फुंक द्या . पण आता असे लक्षात आले आहे की लोक हे करीत नाहीत व परिणामी छाती दाबण्याचा प्रयोगही होत नाही. तर आता नवीन आदेश हा की श्वास देण्याच्या भानगडीत पडू नका व त्याने विशेष परिणामही होत नाही असे आढळले म्हणे .).
एमर्जन्सी फोनवरून बोलणार्या माणसाने अगदी ठामपणे फोन करणार्याला ह्या सूचना द्याव्यात असेही अमेरिकन हार्ट असोसिएशनचे मत आहे.
काळाने आपली प्राण-ज्योत विझवण्याच्या आधी, चला घालूया ही नवीन जीव-फुंकर, आणीबाणीच्या वेळी !
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
the Bhalerao---8
New CPR
The news is practice a new method of CPR ( Cardiio-Pulmonary-Resuscitation ) as advised by the American Heart Association. Last year 3,10,000 people died of heart attack outside the hospital. Only 6 % of the cases survive, but with new CPR they hope 12% can be made to survive. What is this new CPR ?
First let the patient lie dowin on the floor, in a head & nose up position. Place your one hand ( palm facing down, fingers covering approximately over the heart ) at the centre of the chest. Place the second hand on the first, for giving pressure down. Press release the pushes, quickly, ( as quick as giving 100 pushes per minute ) for few times. Don't bother for blowing breaths into the mouth of the patient. ( The survey found that people were not giving CPR because of perceived complication in blowing breaths in the mouth. Hence making it simple will make the CPR being administered to more patients and survival is exected to rise to 12 % from existing 6% ).
People generally phone emergency numbers in most cases and wait for help to arrive, but the person receiving such phones is advised to instruct them, focefully, to administer the new CPR, which anybody can do on clear instructions.
As it is a matter of Life and Death, let us help keep the death away by giving timely new CPR !
Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com
Thursday, July 29, 2010
Thursday, July 22, 2010
द भालेराव-७
"वारसा"चे तत्व
पूर्वी वारसा हक्काने सर्व मिळकत फक्त मोठया मुलाला मिळे. तर कित्येक घरात मोठ्या मुलाला अमुक तमुक देवाला किंवा देवीला वाहून टाकत असत. शिखांमध्ये मोठया मुलाला सरदार व्हावेच लागे. मुसलमानांमध्ये माणसाला आपल्या मिळकतीचा काही भागच ( १/३) मृत्युपत्राद्वारे देता येतो. उरलेल्या २/३ भागातून नातेवाईकांना वारसाहक्काने मालमत्ता वाटतात. त्यात मुलाला दुप्पट भाग मिळतो तर मुलींना एक भाग. २००६ पासून हिंदू मुलींना समान वाटा मिळावा असा कायदा झाला आहे.मृत्युपत्र केलेले नसेल तर मालमत्ता समान भागात वाटतात.
समान भागाचे हे वारसाचे तत्व कसे व का अमलात आले असावे ?
मृत्युपत्रा प्रमाणे वाटणे हे त्या माणसाच्या मताप्रमाणे असल्याने ते अर्थातच त्याच्या मनाप्रमाणे असते.पण त्याच्या पश्चात वाटण्यासाठी काय रास्त प्रमाण असावे ? आपल्याकडे मेरिट म्हणजे मार्क, परीक्षा, असेच समजले जाते.पण एखाद्याची मालमत्ता वाटण्यासाठी काही परीक्षा असत नाही.मग कोणाला किती मार्क्स मिळतील त्याचा काही संबंधच रहात नाही. गरीबी श्रीमंतीवरून वाटण्या केल्या व श्रीमंतालाच परत ज्यास्त वाटा दिला तर ते गरीब वारसाला अन्यायाचे वाटणार.गरीब वारसाला ज्यास्त वाटा दिला तर दुसर्यांना ते अन्यायाचे वाटणार. जसे मृत्युपत्रात त्या माणसाची इच्छा व्यक्त केलेली असते तसे त्याच्या मृत्यू पश्चात काय योग्य हे कसे ठरवायचे ?
प्रत्येक माणसाचा दृश्य हेतू पुढे त्याच्या संततीची प्रगती व्हावी असाच असतो. कोणाची किती प्रगती होऊ शकते ह्याचे काही आडाखे आपण बांधू शकत नाही. कोणी कवी मृत्यू पावला व त्याचा अंश पुढच्या पिढीत रहावा अशी योजना करू म्हटले तर त्याच्या मुलांत कोण चांगला कवी होऊ शकतो हे पहावे लागेल.पण प्रत्यक्षात अंदाजाप्रमाणे किंवा परीक्षेप्रमाणे कोणाची प्रगती होते हे बेभरवशाचे असते. शिवाय कवी असलेल्या माणसाची धन्यता त्याची मुलेही कवी झाल्याने होते की ते डॉक्टर , इंजिनियर झाल्याने होते हे कसे व कोण ठरवणार ? एका माणसाचा डिएनए पुढच्या पिढीत काय झाल्याने प्रगत डिएनए होईल ह्याला काही अदमास नाही. मग सर्वच पुढच्या पिढीच्या डिएनए ज ना सारखे हिस्से दिले तर त्या सर्वांना सारखे प्रोत्साहन दिल्यासारखे होईल. व मग त्यातूनच कोणा तरी वारसाचा डिएनए वाढीस लागेल व मृत्यू पावलेल्या डिएनए ला धन्य वाटेल. हेच असेल समान वारसा हक्काचे तत्व ?

Sunday, May 23, 2010
द भालेराव-६
बदलती घरे, घरांचे बदलणे !
जे पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात त्यांना वाटते ह्या जन्मी माझा वास ह्या शरीरात आहे. त्या अगोदर कदाचित माझ्या आजोबाच्या शरीरात वास असेल, त्या अगोदर कदाचित पणजी आजीच्या शरीरात असेल. असेच असते आपले निरनिराळ्या घरा घरात राहणे.जसा जीव रमतो, त्या त्या काळच्या देहात, तसेच आपले रमणे असते, वेगवेगळ्या घरात.
पण त्या त्या वेळी वाटत असते की कैक वर्षांपासून आपण ह्याच घरात राहतो आहोत. आणि त्या त्या घराची मग आपल्याला ओढ लागून राहते.
आता घाटकोपरच्या घरातच मला वाटते मला तीस वर्षे झालीत. आता इथेच...असे वाटू लागते न लागते तोच आठवते की त्या अगोदर दहा वर्षे इथेच जवळच्या घरात गेली होती. खरे म्हणजे सर्व प्रगती, मुले, त्यांची शिक्षणे, सुबत्ता, पाहुण्या रावळ्यांची वर्दळ वगैरे ह्याच घरात नांदली होती.
पण ह्या घरा अगोदर, ह्या घराची मुहूर्तमेढ रोवली गेली होती, कालीनाच्या घरात. केवढेसे छोटे घर, पण अगदी सोईचे. खरे तर हे होते ट्रेनी इंजिनियरांचे हॉस्टेल.पण बाल्कनीला आत घेऊन स्वयंपाकघर केलेले होते. ह्या घरातच माझ्य़ा मुलीचा जन्म झालेला होता.
आणि त्या अगोदरचे डोंबिवलीचे घर तर विसरणे अशक्यच. अवघ्या दोन खोल्या, स्टेशनपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर,गावाबाहेरच्या गोठया जवळ. पाणी विहीरीचे काढावे लागे. ह्याच घरात पत्नीचे पहिले गर्भारपण झाले. आयुष्या खडतर तर होतेच पण त्यातही एक गंमत होती. बॅंकेतले पहिले खाते इथेच काढणे झाले.
पुण्यातली एरंडवण्यातली खोली तर अगदी स्वप्नवतच होती. टुमदार बंगला व वर ऍटिक सारखी खोली. एका सडया माणसापुरती असलेली ही खोली पण ह्यात भास्करराव खरवडकर एम.डी.चा अभ्यास करायला राह्यले होते,चांगले तीन महिने. रमाकांत देशपांडे, प्रकाश खरवडकर वगैरे मित्रमंडळीही वरचेवर येत असत.
त्या अगोदर सहा महिने मी सन्मित्र कॉलनीतल्या घरात होतो. लेक्चररची नोकरी कधी एकदा सोडतो व घर कधी सोडतो असे झाले होते तेव्हा. अर्थात त्या घराचा त्यात काहीच दोष नव्हता. उलट ते माझ्या वडिलांचे सगळ्यात चांगले घर होते. त्यांचे त्या अगोदरचे चौधरी बंगल्यातले घर तर एखाद्या भुलभुलैय्या सारखेच होते. गच्चीवरच्या रंगीबेरंगी आरसे महालात मॅट्रिकचा अभ्यास करायला खूपच मजा आली होती. शिवाय खादीचे कपडे प्रशस्त हौदाजवळ टिनोपालने धुताना माझी जी तंद्री लागे ती एखाद्या अध्यात्मिक ध्यानाच्या तोडीची असायची.
त्या अगोदरच्या हैद्राबादच्या काचीगुड्याच्या घरात माझे पाचवी ते नववी पर्यंतचे शिक्षण झाले होते. ह्या घराची आठवण होते तेव्हा माणसांचे प्रचंड मोठे घोळके आठवतात. पाहुणे रावळे, कार्यकर्ते, विद्यार्थी, त्यांची क्रिकेटची टीम, त्यात माझे विकेट कीपींग असे प्रचंड घाई गर्दीचे दिवस आठवतात. त्यातच टेबलाखाली बसून दिवाळी अंकांचा हस्तलिखितातला साहित्य ठेवा मी वाचीत असे, गुपचूप.
त्या अगोदरचे प्राथमिक शिक्षणा दरम्यान घर होते सुलतान बाजारात. पारगावकरांच्या शेजारी. इथून शाळा अगदी जवळ असल्याने, शाळा सुटल्यानंतर मोकळ्या शाळेत खेळण्याचा अनोखा आनंद मला मिळाला. ह्या घराचा उंचच उंच जिना व त्यावरूनचे घसरणे मला चांगलेच आठवते. त्या अगोदरचे घर होते गामजी बिल्डींग मधले. पंधरा वीस बिर्हाडं एका बंगल्यात असलेली ही वास्तू. हीत अगदी अनोखी बाब होती, ती म्हणजे कम्यनिटी संडास. दहा पंधरा जणं, एकदम बसतील असा एवढा मोठा चराचा संडास.
त्या अगोदरचे आठवणारे घर म्हणजे आजोबांचे खंडाळ्याचे. प्रचंड मोठा वाडा. प्रवेशालाच एक धनगर जोडपे राखणदारासारखे रहात असे. त्यांचे लग्नही मला चांगले आठवते. माझी आजी चिंध्यांचा चेंडू करायची व माझे काका लोक त्याने धप्पाकुट्टी नावाचा खेळ खेळत. आजोबांच्या भजनाला आलेली मंडळी एकत्र परातीने चहा पीत असत.
अबब ! नुसती आठवणारी घरे वरची मोजली तर भरतील,बारा. आणि शिवाय पुण्याला माझी आत्ताची दोन घरे मोजली तर भरतील तेरा. आणि जनरीती प्रमाणे एक दिवस ही सगळी घरे सोडून मला जावे तर लागणारच आहे. मी कितीही कोणत्या घराबद्दल ममत्व जपले तरी !
अरूण अनंत भालेराव
९३२४६८२७९२

Saturday, April 24, 2010
द भालेराव : ५
गोड साक्षात्कार !
मला नुकतीच शुगर निघाली आणि एक गोड साक्षात्कारच झाला !
प्रत्येक माणसात देवाचा अंश असतोच, असे म्हणतात, तसा प्रत्येक माणसात शुगर असतेच हे मात्र आता मला स्वानुभावाने कळले.
बाहेरून साखरेच्या असण्याचे काही प्रमाण दिसत नाही, पण तपासले तर प्रत्येकात देव आढळतोच तशी थोडी वा फार साखर निघतेच निघते.
एकदा का हा दैवी साक्षात्कार झाला की मग गोडी कमी झाली तर चालत नाही. म्हणजे शुगर कमी झाली की चक्कर येते तसेच देवाची गोडी कमी झाली की नाही नाही त्या फेर्यात (चक्करेत) माणूस पडतो.
शुगर निघाली रे निघाली की फिरणे अगदी अत्यावश्यक होते. कारण देतात, अतिरिक्त गोडी जाळण्याचे. देवाचा साक्षात्कार झाला की असेच होते. बसून न राहता सगळीकडे मिरवावे लागते.
शुगर निघाली की आपण जे एरव्ही बका बका खातो ते थांबते. कशात किती साखर आहे हे पाहणे अगदी चौकस होते. प्रत्येक पदार्थात आपण काय चांगले काय वाईट ते बघू लागतो. देवाचा साक्षात्कार झाला की सगळीकडे पाहण्य़ाची नजर अशीच विवेकाची ठेवावी लागते. कोण चांगला आहे, सत्संग कोणता, हे पाहत जगावे लागते.
जेवणानंतरची शुगर ज्यास्त असते तर सकाळी फास्टींगची कमी असते. म्हणजे साखर कमी असावी तर उपास घडला पाहिजे. ह्याच नियमावरून देवासाठी उपास तापास करण्याची परंपरा तयार झाली असावी.
देवाचा अंश आपल्यात आला की आपण कसे देवमय होऊन जातो, देवात विलीन होतो तसाच काहीसा संकेत शुगर येण्याचा असतो. म्हणजे आता शुगर आलीय तर पर्याणाचा अंतिम दिवस, गोड शेवट, फार लांब नाही हाच तो संकेत !
--अरूण भालेराव
भ्रमण :९३२४६८२७९२

Tuesday, April 13, 2010
:द भालेराव : ४
आयेशा, लई भारी !
सर्व सौंदर्यशास्त्राचा पचका करीत, सुंदर सानियाचा पार चुराडा केलाय आयेशा आपाने ! शोएबला तर तिने चिमटूनच टाकले आहे. आता म्हणे आयेशाचा भाव खूपच वधारला आहे. साहजिकच आहे. तिचे वजन असेल, १५० किलो. आणि तिला देऊ केलेत १५ कोटी रुपये, म्हणजे, गेला बाजार, भाव पडतो, दहा लाख रुपये किलो ! सर्व साधारण बाई-माणसांसारखे तिने डाएटिंग वगैरे केले नाही ते बरेच झाले म्हणायचे. अजून एक बरे झाले की आयेशा किंवा शोएब बंगाली नाही झाले. नाही तर बंगाली वराला लग्नात बधूला उचलावे लागते ते अशक्यच झाले असते !
खरी लग्नामागची बातमी शरद पवारांनी गुलदस्त्यात ठेवली होती. अजूनही ती तशी बाहेर आलेली नाहीय.
पण तुम्ही आपल्यातलेच म्हणून सांगायला हरकत नाही की शोनिया ह्यांनी एक क्रिकेट टीम आयपीएल मध्ये विकत घेतली आहे. ह्यांचे स्टेडीयम दुबईला राहणार असून ते क्रिकेटचा खेळ टेनिसच्या नियमांनुसार खेळणार आहेत. ते असे :
१) फर्स्ट सर्व जशी नेटला घसटून गेली तर परत री-सर्व करतात, तसे पहिला बॉल स्टंप्स्ना घसटून गेला तर तो परत टाकावा लागेल.
२)असे दोनदा घडले तर तो बोलरचा "डबल फॉल्ट" धरण्यात येईल.
३) समजा पहिला पॉइंट तुमचा गेला ( म्हणजे पहिल्या बॉलवर रन नाही मिळाला ) व प्रतिपक्षालाही असेच झाले तर "लव्ह ऑल" असे घोषित करण्यात येईल व कोर्टवर हजर असलेल्या पैकी सगळ्यात वजनदार व्यक्तीला प्राईझ-मनी द्यावा लागेल.
४) लग्नाआधी शोएबला जसा डायव्होर्स घ्यावा लागला तसा प्रत्येक खेळाडूला टीमपासून डायव्होर्स घ्यावा लागेल.
५) मॅच ठरलेल्या तारखेच्या आधीच होईल.
६) मॅच झाल्यावर प्रत्येक खेळाडूला आपला देश सोडून दुसर्या देशात स्थलांतर करावे लागेल.
७) मॅच दरम्य़ान फक्त बिर्याणी देण्यात येईल.
अरूण अनंत भालेराव
भ्रमण : ९३२४६८२७९२

Friday, March 5, 2010
मौखिक परंपरेचे मुख !
तुकाराम महाराजांच्या काळी जो वारकरी संप्रदाय होता,त्याची म्हणतात मौखिक परंपरा होती. म्हणजे जे काही संप्रदायाचे ज्ञान, नियम, रीती-रिवाज होते,ते कुठे लिखित स्वरूपात नव्हते तर सर्व तोंडी होते. जसे भजन, कीर्तन वगैरे सर्व मुखाने म्हणण्याचे प्रकार होते. अशी ही मौखिक परंपरा.
त्याच वेळी दुसरा एक महानुभावी संप्रदाय होता. तो वारकर्यांपेक्षा प्रगत होता.पण त्यांचे साहित्य,नियम,रूढी वगैरे सर्व मोडी लिपीत लिखित स्वरूपात होते.ह्या कठिण प्रकारापायी हा संप्रदाय लवकर लयाला गेला. मौखिक परंपरेमुळे वारकरी संप्रदाय बराच टिकला, वाढला.
आपल्याला वाटते, आज जग किती पुढे गेले आहे,सगळे कसे नीट,संगतवार लिहून ठेवलेले असते. मोठमोठे करार व्यवस्थित कलमे घालून लिहून ठेवलेल्या बाडातून असतात. सगळ्यात मोठ्ठा करार कोणता ? " आय डू " किंवा "शुभ लग्न सावधान" म्हणून होणारे लग्न ! का हा मोठ्ठा करार ? कारण ह्या करारान्वये संतती निर्माण करीत लोक एक नवीन पीढी तयार करतात. ह्यापेक्षा मोठी निर्मिती ती काय ? आणि कसा असतो हा करार ? तोंडी ! आणि त्याला कायद्याच्या सर्व बाबी लागू होतात. चालू आहे ना मौखिक परंपरा !
वीस पंचवीस वर्षापूर्वी शेअर बाजार,सट्टे बाजार हे सर्व तोंडी चालत. खूप दाटी होई. दलालांना लटकण्यासाठी बस मध्ये असतात तसे चामड्याचे पट्टे असत. मोठ्ठ्याने ओरडत, खाणाखुणा करीत हे सर्व चाले.मोठ मोठे लिलाव कसे होतात ? ( आयपीएल चा लिलाव आठवा ) बोली तोंडी लावावी लागते. लिलाव करणारा म्हणतो, दस लाख एक बार, दस लाख दो बार, दस लाख तीन बार, सोल्ड ! खल्लास इकडचा बंगला तिकडे ! निवडणुकींचे,क्रिकेटचे,सट्टे फोन वरून, तोंडीच असतात.
प्रत्येक माणूस भाषा शिकतो तो आईच्या तोंडून आपल्या तोंडी, मौखिक परंपरेने. गाणी तर बोलून चालून सगळा तोंडी मामला. हुशार मुलाला शिकवाल ते तोंडपाठ असते.पूर्वी परीक्षाही तोंडी असत. अजूनही डॉक्टरीची अवघड परीक्षा तोंडीच असते. पीएचडीचे डिफेन्स नावाचे भाषण व प्रश्नोत्तरे तोंडीच असतात. ग्रेट ग्रेट गुरू, लेक्चर्स देतात तोंडी. निवडणुका जिंकल्या जातात तोंडी भाषणांनी. देश चालवल्या जातो, लोकसभेत, तोंडी. माणसाचे सर्व महत्वाचे व्यवहार, जसे, शिक्षण, प्रेम, संसार, गुजगोष्टी, आरडाओरडा, त्रागा, आवाहने, आव्हाने,ऑफिसातल्या मीटींग्ज, रस्त्यावरची गजबज, मुलांचे संगोपन, नातेवाईकांशी संवाद, वगैरे ,तोंडीच होतात. म्हणजे मौखिक परंपरा आपण अजून पाळतोय तर !
आयटी ( संगणक ) युगामुळे सगळे संगणकाच्या भाषेत सांगितले तरच लवकर कळते. मौखिक परंपरा किती महत्वाची माहीती आहे ? अहो संगणकात सगळ्यात मोठी फाईल साऊंड बाइट्सचीच होते. म्हणजे मौखिक परंपराच ग्रेट !
---अरुण अनंत भालेराव
भ्र:९३२४६८२७९२

Subscribe to:
Posts (Atom)