द भालेराव----११
घसरती पॅंट ! सॅगिंग !
फॅशनच्या युगात काय काय बघायला मिळेल त्याचा काही नेम नाही. इथे सध्या एक विचित्रच फॅशन पहायला मिळते आहे. नेहमीचीच जीन, पण पोरे ती इतकी खाली नेसतात की ती सारखी घसरत असते व एका हाताने धरून ठेवायला लागते. बहुतेक करून आफ्रिकन-अमेरिकन पुरुष ही फॅशन करताना आजकाल मॉल्स मध्ये दिसतात. इथली हायस्कूल ( ११वी,१२वी ) ची मुले असल्या पॅंटी घालून कशी काय शाळेत वावरतात हे समजायला अवघडच आहे. आता आपल्याकडेही ही फॅशन येईलच.
गुजरातीत एक वाक्प्रचार आहे, "धोती फाडके बनाया रुमाल", म्हणजे मराठीत कांसेचे नेसते डोक्याला गुंडाळल्यासारखाच हा प्रकार आहे. तुकाराम महाराज चांगल्या लोकांची भलामण करू, पण नाठाळांना बदडून काढू असे म्हणताना म्हणतात : "भले तरी देऊ । कासेची लंगोटी । नाठाळाचे माथा । हाणू काठी । " त्यावरून त्याकाळी लंगोटी नेसत असत ही बातमी आपल्याला लागते. लंगोटी हा प्रकार आतल्या चड्डीचा, अगदी चिंचोळी चिंधी असा. पण तो फक्त आखाड्यात किंवा क्वचित प्रसंगी न्हाणीघरात दिसत असे. बाहेरचीच पँट अशी ढिल्ली ढाली घसरती नेसण्याचा हा प्रकार नवीनच म्हटला पाहिजे.
हा प्रकार घालणार्यांना काही तरी अघटित करण्याचे समाधान देत असेल, पण त्यात काही आकर्षकपणा मात्र सुतराम दिसत नाही. उलट आतली अंडरवेअर दिसत असल्याने हे दृश्य ओंगळवाणे ज्यास्त दिसते. पण खोडकर मुलांना तेच हवे असते, जसे आजकाल ती एखादी गोष्ट चांगली आहे हे म्हणताना ते म्हणतात की किती "डिसगस्टिंग !"
ह्यांच्या पॅंटी लवकरातल्या लवकर घसरो व ......!
अरूण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
The Bhalerao----11
Sagging Jeans, Sagging Fashion !
In fashion-world you are not shure what could be next ! Nowadays , male kids here, mostly African-American, in malls, are seen to be holding their pants ( jeans ) up with one hand and walking like a rap artist. If these grown-up kids ( 11th, 12th graders ) wear such sagging jeans in High School, it must be a very odd sight for the school atmosphere.
The sagging jean is to be worn so low that the underwear should be visible. In distant past we might have seen people wearing very scant dresses or only a strip like thing ( langot ). But the civilisation has made much progress thereafter and now wearing such jeans, though in the name of fashion, is very confusing.
If the guys wearing these jeans imagine that it could be adding to their sex-appeal as the underwear is revealing it will only show their bankruptacy in aesthetics. It definitely does not add to any appeal but makes the onlookers disgusting.
But these days kids apply a word and mean something else. Like when they like something very much they are likely to say "it is disgusting !" So, whatever their intended meaning, disgusting it is !
Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com
Saturday, August 28, 2010
Thursday, August 19, 2010
द भालेराव---१०
आधी अंडे का कोंबडी ?
अमेरिकेची सुधारण्याची किंवा बदलण्याची काही लक्षणे दिसत नाहीत. ह्या आठवडयात आता अंडी बाजारातून मागे घेतली जाताहेत, कारण काय तर साल्मोनेल्लाची त्याला बाधा झालीय व लोक ती खाल्ल्याने आजारी पडताहेत.
एखाद्या विषयाचा काथ्याकूट नाही केला तर मग ती अमेरिका काय म्हणायची ? आता इतक्या साध्या विषयावर उपाय, अपाय वगैरे असे कितीसे असणार असे आपल्याला वाटते न वाटते तोच वर्तमानपत्रांचे रकाने तत्परतेने सांगतात : प्रोपोझिशन-२ अन्वये कोंबडयांची खुराडी मोठी व वातानुकूलित न केल्याने हे दुष्परिणाम होत आहेत. आपल्याकडच्या मनेका गांधी सारख्या एका संस्थेचे ( ह्युमेन ट्रीटमेंट फॉर फार्म अॅनिमल्स ) म्हणणे असे की कोंबडीला खुराडयात ताणून उभे राहता येऊन, चक्क गिरकी घेता यायला हवी, एवढी प्रशस्त खुराडी हवीत. कोंबड्यांना दाटी झाली की अंडी सुख देणारी होत नाहीत.
आता पोल्ट्रीवाले म्हणतात की एवढे करायचे तर खर्च कोण देणार ? शिवाय ही पहा आमची नवी प्रशस्त वातानुकूलित खुराडी, पण कोंबड्या बघा कशा एकत्र घोळका करून कोपर्यात बसताहेत. मग अलीशान खुराड्यांचा काय उपयोग ? आणि सगळ्या जगातल्या कोंबड्यांना कोंडवाडे चालतात, मग आमचीच अंडी दु:खी कशी ? सगळ्या जगाचीच खुराडी मोठी होऊ द्यात, मग आम्ही करू.
काही मनेका गांधी वाले लोक इथे म्हणताहेत की खरे तर कोंबड्यांना मुक्त चरू द्यावे, त्यांना मोकळेच ठेवावे. ह्यावर पोल्ट्रिवाले म्हणतात, अहो अशाने त्या एकमेकांच्या घाणीतून फिरतील व मग त्यांना अॅंटिबायोटिक्स द्यावे लागेल. ( शिवाय त्यांना पकडणे व अंडी गोळा करणे जिकिरीचे होईल ते वेगळेच ! ).
कदाचित ह्या सगळ्या काथ्याकूटीचा एक रोख असा असावा की कशाची काळजी कशी करावी ह्या व्यूहामध्ये, आधी कोंबडी का आधी अंडे, ह्या व्यूहचक्रामधून सुटण्याचा एकमेव मार्ग, कोंबडी व अंडी खाणेच सोडावे, असा असावा ! थॅंक्स अमेरिका !
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
the Bhalerao---10
Which first, the egg or hen ?
There are no signs that America will ever improve and simplify. Last week, we saw a recall of lot of eggs all over due to Salmanella infection and people falling sick due it.
What is America, if you can't debate the silliest issue to ones heart's desire and unto the last resort ? Newspapers are filling us up with incredible details on this world's primitive riddle," which first egg or hen ?". An NGO similar to what Maneka Gandhi runs in India, one organisation here for humane treatement to farm animals says that hen cages should be air-conditioned and should be large enough. The hen, they say, should be able to stretch inside and also turn around easily. The egg producers counter on this, that who will pay for such cages ? Moreover, see how all the hen are huddling together inspite of the spacious cages. And they also want all the rest of the world to evolve standards for spacious cages and then they will follow the same here.
Some animal lovers go so further as to plead total freedom for hen in the open ( with no cages ). The egg producers have problem on this that the hen will then run into each other's feces and will have to be treated with anti-biotics and this will be more expensive. And of course the egg collection will be quite a task in such a free environment !
Perhaps there is lesson in all this discussion for America and the world apart from the age-old riddle of which first, the egg or the hen ? and that could be that don't eat eggs or hen !

Monday, August 9, 2010
द भालेराव---९
अनीतीचा मोह !
एच पी ह्या मोठ्ठ्या संगणक कंपनीचा मुख्याधिकारी, प्रचंड पगार, वयही झालेले, ७ मिलियन डॉलरचे घर, मोठी मोठी मुले, बरे कंपनीत तसा मानही चांगला, चांगली कर्तबगारी, आणि कोणा एका ५० वर्षाच्या बाईच्या नादी लागून सर्वस्वाचा र्हास करून घेतो ! हे असे का होते ? अनीतीचा एवढा कसा मोह पडतो ?
आणि हे लहानपणापासूनचे आहे. चोर-पोलीस खेळात सगळ्यांना चोरच व्हायचे असते ! हुशार, सभ्य मुलाला मुली शामळू म्हणून हिणवतात तर टग्यांबरोबर आई-वडिलांना फसवून सिनेमाला जाऊ इच्छितात. सगळे चांगले, दोरी धरल्या सन्मार्गाने चालू आहे असे म्हणताच चांगल्या चांगल्यांना अवदसा आठवते, दारूच प्यायला लागतात, किंवा घरी चांगली बायको असताना बाहेरख्यालीपणा करतात. सगळ्यांचेच कसे असे न चुकता होते ?
अगदी प्रेसिडेंट असलेल्या क्लिंटनना ऑफीसमध्ये चाळे करण्याचे काय अडले होते. नीट ठरवले असते तर ह्याही पेक्षा ज्यास्त अनीतीची कामे ते बिनबोभाट, पकडले न जाता सहजी करते पण त्यांना थ्रिल हवे असणार ! विश्वामित्राला सुद्धा हा मोह आवरता आला नाही. पुरुष आपल्या मोकाट लैंगिक कल्पना ( फॅंटसीज) एकमेकांना चढाओढीने रंगवून रंगवून सांगतात व तडीला नेण्याचा चंग बांधतात आणि मग कुठे तरी फसतात, पकडल्या जातात.
तर, ह्यावरचा उपाय, असा की जमेल त्याने मोह टाळावा किंवा निदान पकडल्या जाणार नाही अशी खबरदारी घ्यावी. कंपनीच्या खर्चानेच भानगड करायची असेल तर ती खर्चात "बिझनेस डेव्हलपमेंट किंवा लॉबीयिंग" अशा गोड सदरात घालावी ! किंवा "महिला गटास मदत" !
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
Arunoday Zaalaa---9
Lure of Immorality !
A CEO of a big company like HP, huge salary, a 7 million dollar house, grown up kids, an efficient career and all that goes down the drain due to some tame affair with a 50 yr old lady ! Why do men fall so cheaply ?
This curse seems to have been incurred right from childhood . In a game of thief and police, no one wants to be a catching police but a thief on the run ! A brilliant, studious straight guy in school is disliked by the girls and they fall for a cheap, bully like, cool guy ! When we see a regular careerists house with good amenities, good school for children, nice car etc., suddenly we find picture being tarnished by too much indulgence of the man in parties, drinks and the chicks !
Even the high and mijghty fall from grace with prompt regularity. If Bill Clinton had used little descretion he could have done much more sins without getting caught, that too, in office. Even the sage Vishwamitra had to fall so easily for the charms of Menaka ! Men exchange their sexual fantacies with friends and hope that they too can emulate the dreams thrown at them !
Remedy perhaps is to avoid the lure for those who can or at least, the lesson would be learnt in not getting caught ! If you must womanise, at the company's expense, at least take care to bill it in proper account heads such as "business liasion, or business development" or better still "women upliftment !"

Subscribe to:
Posts (Atom)