Saturday, August 28, 2010

द भालेराव----११

घसरती पॅंट ! सॅगिंग !

फॅशनच्या युगात काय काय बघायला मिळेल त्याचा काही नेम नाही. इथे सध्या एक विचित्रच फॅशन पहायला मिळते आहे. नेहमीचीच जीन, पण पोरे ती इतकी खाली नेसतात की ती सारखी घसरत असते व एका हाताने धरून ठेवायला लागते. बहुतेक करून आफ्रिकन-अमेरिकन पुरुष ही फॅशन करताना आजकाल मॉल्स मध्ये दिसतात. इथली हायस्कूल ( ११वी,१२वी ) ची मुले असल्या पॅंटी घालून कशी काय शाळेत वावरतात हे समजायला अवघडच आहे. आता आपल्याकडेही ही फॅशन येईलच.

गुजरातीत एक वाक्प्रचार आहे, "धोती फाडके बनाया रुमाल", म्हणजे मराठीत कांसेचे नेसते डोक्याला गुंडाळल्यासारखाच हा प्रकार आहे. तुकाराम महाराज चांगल्या लोकांची भलामण करू, पण नाठाळांना बदडून काढू असे म्हणताना म्हणतात : "भले तरी देऊ । कासेची लंगोटी । नाठाळाचे माथा । हाणू काठी । " त्यावरून त्याकाळी लंगोटी नेसत असत ही बातमी आपल्याला लागते. लंगोटी हा प्रकार आतल्या चड्डीचा, अगदी चिंचोळी चिंधी असा. पण तो फक्त आखाड्यात किंवा क्वचित प्रसंगी न्हाणीघरात दिसत असे. बाहेरचीच पँट अशी ढिल्ली ढाली घसरती नेसण्याचा हा प्रकार नवीनच म्हटला पाहिजे.

हा प्रकार घालणार्‍यांना काही तरी अघटित करण्याचे समाधान देत असेल, पण त्यात काही आकर्षकपणा मात्र सुतराम दिसत नाही. उलट आतली अंडरवेअर दिसत असल्याने हे दृश्य ओंगळवाणे ज्यास्त दिसते. पण खोडकर मुलांना तेच हवे असते, जसे आजकाल ती एखादी गोष्ट चांगली आहे हे म्हणताना ते म्हणतात की किती "डिसगस्टिंग !"

ह्यांच्या पॅंटी लवकरातल्या लवकर घसरो व ......!

अरूण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

The Bhalerao----11

Sagging Jeans, Sagging Fashion !

In fashion-world you are not shure what could be next ! Nowadays , male kids here, mostly African-American, in malls, are seen to be holding their pants ( jeans ) up with one hand and walking like a rap artist. If these grown-up kids ( 11th, 12th graders ) wear such sagging jeans in High School, it must be a very odd sight for the school atmosphere.

The sagging jean is to be worn so low that the underwear should be visible. In distant past we might have seen people wearing very scant dresses or only a strip like thing ( langot ). But the civilisation has made much progress thereafter and now wearing such jeans, though in the name of fashion, is very confusing.

If the guys wearing these jeans imagine that it could be adding to their sex-appeal as the underwear is revealing it will only show their bankruptacy in aesthetics. It definitely does not add to any appeal but makes the onlookers disgusting.

But these days kids apply a word and mean something else. Like when they like something very much they are likely to say "it is disgusting !" So, whatever their intended meaning, disgusting it is !

Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com

Thursday, August 19, 2010

द भालेराव---१०

आधी अंडे का कोंबडी ?

अमेरिकेची सुधारण्याची किंवा बदलण्याची काही लक्षणे दिसत नाहीत. ह्या आठवडयात आता अंडी बाजारातून मागे घेतली जाताहेत, कारण काय तर साल्मोनेल्लाची त्याला बाधा झालीय व लोक ती खाल्ल्याने आजारी पडताहेत.

एखाद्या विषयाचा काथ्याकूट नाही केला तर मग ती अमेरिका काय म्हणायची ? आता इतक्या साध्या विषयावर उपाय, अपाय वगैरे असे कितीसे असणार असे आपल्याला वाटते न वाटते तोच वर्तमानपत्रांचे रकाने तत्परतेने सांगतात : प्रोपोझिशन-२ अन्वये कोंबडयांची खुराडी मोठी व वातानुकूलित न केल्याने हे दुष्परिणाम होत आहेत. आपल्याकडच्या मनेका गांधी सारख्या एका संस्थेचे ( ह्युमेन ट्रीटमेंट फॉर फार्म अ‍ॅनिमल्स ) म्हणणे असे की कोंबडीला खुराडयात ताणून उभे राहता येऊन, चक्क गिरकी घेता यायला हवी, एवढी प्रशस्त खुराडी हवीत. कोंबड्यांना दाटी झाली की अंडी सुख देणारी होत नाहीत.

आता पोल्ट्रीवाले म्हणतात की एवढे करायचे तर खर्च कोण देणार ? शिवाय ही पहा आमची नवी प्रशस्त वातानुकूलित खुराडी, पण कोंबड्या बघा कशा एकत्र घोळका करून कोपर्‍यात बसताहेत. मग अलीशान खुराड्यांचा काय उपयोग ? आणि सगळ्या जगातल्या कोंबड्यांना कोंडवाडे चालतात, मग आमचीच अंडी दु:खी कशी ? सगळ्या जगाचीच खुराडी मोठी होऊ द्यात, मग आम्ही करू.

काही मनेका गांधी वाले लोक इथे म्हणताहेत की खरे तर कोंबड्यांना मुक्त चरू द्यावे, त्यांना मोकळेच ठेवावे. ह्यावर पोल्ट्रिवाले म्हणतात, अहो अशाने त्या एकमेकांच्या घाणीतून फिरतील व मग त्यांना अ‍ॅंटिबायोटिक्स द्यावे लागेल. ( शिवाय त्यांना पकडणे व अंडी गोळा करणे जिकिरीचे होईल ते वेगळेच ! ).

कदाचित ह्या सगळ्या काथ्याकूटीचा एक रोख असा असावा की कशाची काळजी कशी करावी ह्या व्यूहामध्ये, आधी कोंबडी का आधी अंडे, ह्या व्यूहचक्रामधून सुटण्याचा एकमेव मार्ग, कोंबडी व अंडी खाणेच सोडावे, असा असावा ! थॅंक्स अमेरिका !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

the Bhalerao---10

Which first, the egg or hen ?

There are no signs that America will ever improve and simplify. Last week, we saw a recall of lot of eggs all over due to Salmanella infection and people falling sick due it.

What is America, if you can't debate the silliest issue to ones heart's desire and unto the last resort ? Newspapers are filling us up with incredible details on this world's primitive riddle," which first egg or hen ?". An NGO similar to what Maneka Gandhi runs in India, one organisation here for humane treatement to farm animals says that hen cages should be air-conditioned and should be large enough. The hen, they say, should be able to stretch inside and also turn around easily. The egg producers counter on this, that who will pay for such cages ? Moreover, see how all the hen are huddling together inspite of the spacious cages. And they also want all the rest of the world to evolve standards for spacious cages and then they will follow the same here.

Some animal lovers go so further as to plead total freedom for hen in the open ( with no cages ). The egg producers have problem on this that the hen will then run into each other's feces and will have to be treated with anti-biotics and this will be more expensive. And of course the egg collection will be quite a task in such a free environment !

Perhaps there is lesson in all this discussion for America and the world apart from the age-old riddle of which first, the egg or the hen ? and that could be that don't eat eggs or hen !

Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com

Monday, August 9, 2010

द भालेराव---९
अनीतीचा मोह !
एच पी ह्या मोठ्ठ्या संगणक कंपनीचा मुख्याधिकारी, प्रचंड पगार, वयही झालेले, ७ मिलियन डॉलरचे घर, मोठी मोठी मुले, बरे कंपनीत तसा मानही चांगला, चांगली कर्तबगारी, आणि कोणा एका ५० वर्षाच्या बाईच्या नादी लागून सर्वस्वाचा र्‍हास करून घेतो ! हे असे का होते ? अनीतीचा एवढा कसा मोह पडतो ?

आणि हे लहानपणापासूनचे आहे. चोर-पोलीस खेळात सगळ्यांना चोरच व्हायचे असते ! हुशार, सभ्य मुलाला मुली शामळू म्हणून हिणवतात तर टग्यांबरोबर आई-वडिलांना फसवून सिनेमाला जाऊ इच्छितात. सगळे चांगले, दोरी धरल्या सन्मार्गाने चालू आहे असे म्हणताच चांगल्या चांगल्यांना अवदसा आठवते, दारूच प्यायला लागतात, किंवा घरी चांगली बायको असताना बाहेरख्यालीपणा करतात. सगळ्यांचेच कसे असे न चुकता होते ?

अगदी प्रेसिडेंट असलेल्या क्लिंटनना ऑफीसमध्ये चाळे करण्याचे काय अडले होते. नीट ठरवले असते तर ह्याही पेक्षा ज्यास्त अनीतीची कामे ते बिनबोभाट, पकडले न जाता सहजी करते पण त्यांना थ्रिल हवे असणार ! विश्वामित्राला सुद्धा हा मोह आवरता आला नाही. पुरुष आपल्या मोकाट लैंगिक कल्पना ( फॅंटसीज) एकमेकांना चढाओढीने रंगवून रंगवून सांगतात व तडीला नेण्याचा चंग बांधतात आणि मग कुठे तरी फसतात, पकडल्या जातात.

तर, ह्यावरचा उपाय, असा की जमेल त्याने मोह टाळावा किंवा निदान पकडल्या जाणार नाही अशी खबरदारी घ्यावी. कंपनीच्या खर्चानेच भानगड करायची असेल तर ती खर्चात "बिझनेस डेव्हलपमेंट किंवा लॉबीयिंग" अशा गोड सदरात घालावी ! किंवा "महिला गटास मदत" !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com


Arunoday Zaalaa---9
Lure of Immorality !
A CEO of a big company like HP, huge salary, a 7 million dollar house, grown up kids, an efficient career and all that goes down the drain due to some tame affair with a 50 yr old lady ! Why do men fall so cheaply ?

This curse seems to have been incurred right from childhood . In a game of thief and police, no one wants to be a catching police but a thief on the run ! A brilliant, studious straight guy in school is disliked by the girls and they fall for a cheap, bully like, cool guy ! When we see a regular careerists house with good amenities, good school for children, nice car etc., suddenly we find picture being tarnished by too much indulgence of the man in parties, drinks and the chicks !
Even the high and mijghty fall from grace with prompt regularity. If Bill Clinton had used little descretion he could have done much more sins without getting caught, that too, in office. Even the sage Vishwamitra had to fall so easily for the charms of Menaka ! Men exchange their sexual fantacies with friends and hope that they too can emulate the dreams thrown at them !
Remedy perhaps is to avoid the lure for those who can or at least, the lesson would be learnt in not getting caught ! If you must womanise, at the company's expense, at least take care to bill it in proper account heads such as "business liasion, or business development" or better still "women upliftment !"


Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com

Thursday, July 29, 2010

द भालेराव---८

जीव-फुंकर किंवा सीपीआर

कोणाला ह्र्दयविकाराचा झटका आला असेल तर त्याला तात्काळ करावयाचा उपचार असतो सी पी आर ( कार्डिओ पल्मोनरी रिससायटेशन ) किंवा जीव-फुंकर ( हा आपला मला आवडलेला शब्द ! ). अमेरिकेसारख्या प्रगत देशात म्हणे वर्षात ३ लाख लोकांना हॉस्पीटल बाहेत ह्रदयविकाराचे झटके येऊन मरण आले ( ह्या वर्षी ). नुकत्याच केलेल्या पाहणीनुसार ह्यापैकी फक्त ६ टक्के वाचतात. जर ह्यांना नवीन प्रकारची जीव-फुंकर मिळाली तर त्यातले १२ टक्के लोक वाचतील असे अमेरिकन हार्ट असोसिएशनचे म्हणणे आहे. काय आहे ही नवीन प्रकारची जीव-फुंकर ?

झटका आलेल्याला प्रथम जमीनीवर आडवे झोपवावे ( अर्थात पालथे नव्हे, तोंड वर ) . छातीवर, मधोमध, एक हात ( तळवा, बोटे ह्रदयावर अंदाजे येतील असा, ) ठेवावा. दुसर्‍या हाताचा तळवा त्यावर जोर देण्यासाठी ठेवावा. मग छातीवर हाताने जोर देत दर मिनिटाला १०० भरतील इतके भरभर दाबावे. तोंडाने हवा फुंकण्याच्या भानगडीत पडू नये. ( चमकू नका. पूर्वी म्हणत की दोन वेळा पूर्ण श्वासाचे दोन फुंक द्या . पण आता असे लक्षात आले आहे की लोक हे करीत नाहीत व परिणामी छाती दाबण्याचा प्रयोगही होत नाही. तर आता नवीन आदेश हा की श्वास देण्याच्या भानगडीत पडू नका व त्याने विशेष परिणामही होत नाही असे आढळले म्हणे .).

एमर्जन्सी फोनवरून बोलणार्‍या माणसाने अगदी ठामपणे फोन करणार्‍याला ह्या सूचना द्याव्यात असेही अमेरिकन हार्ट असोसिएशनचे मत आहे.

काळाने आपली प्राण-ज्योत विझवण्याच्या आधी, चला घालूया ही नवीन जीव-फुंकर, आणीबाणीच्या वेळी !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

the Bhalerao---8
New CPR
The news is practice a new method of CPR ( Cardiio-Pulmonary-Resuscitation ) as advised by the American Heart Association. Last year 3,10,000 people died of heart attack outside the hospital. Only 6 % of the cases survive, but with new CPR they hope 12% can be made to survive. What is this new CPR ?

First let the patient lie dowin on the floor, in a head & nose up position. Place your one hand ( palm facing down, fingers covering approximately over the heart ) at the centre of the chest. Place the second hand on the first, for giving pressure down. Press release the pushes, quickly, ( as quick as giving 100 pushes per minute ) for few times. Don't bother for blowing breaths into the mouth of the patient. ( The survey found that people were not giving CPR because of perceived complication in blowing breaths in the mouth. Hence making it simple will make the CPR being administered to more patients and survival is exected to rise to 12 % from existing 6% ).

People generally phone emergency numbers in most cases and wait for help to arrive, but the person receiving such phones is advised to instruct them, focefully, to administer the new CPR, which anybody can do on clear instructions.

As it is a matter of Life and Death, let us help keep the death away by giving timely new CPR !

Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com

Thursday, July 22, 2010

द भालेराव-७
"वारसा"चे तत्व
पूर्वी वारसा हक्काने सर्व मिळकत फक्त मोठया मुलाला मिळे. तर कित्येक घरात मोठ्या मुलाला अमुक तमुक देवाला किंवा देवीला वाहून टाकत असत. शिखांमध्ये मोठया मुलाला सरदार व्हावेच लागे. मुसलमानांमध्ये माणसाला आपल्या मिळकतीचा काही भागच ( १/३) मृत्युपत्राद्वारे देता येतो. उरलेल्या २/३ भागातून नातेवाईकांना वारसाहक्काने मालमत्ता वाटतात. त्यात मुलाला दुप्पट भाग मिळतो तर मुलींना एक भाग. २००६ पासून हिंदू मुलींना समान वाटा मिळावा असा कायदा झाला आहे.मृत्युपत्र केलेले नसेल तर मालमत्ता समान भागात वाटतात.
समान भागाचे हे वारसाचे तत्व कसे व का अमलात आले असावे ?
मृत्युपत्रा प्रमाणे वाटणे हे त्या माणसाच्या मताप्रमाणे असल्याने ते अर्थातच त्याच्या मनाप्रमाणे असते.पण त्याच्या पश्चात वाटण्यासाठी काय रास्त प्रमाण असावे ? आपल्याकडे मेरिट म्हणजे मार्क, परीक्षा, असेच समजले जाते.पण एखाद्याची मालमत्ता वाटण्यासाठी काही परीक्षा असत नाही.मग कोणाला किती मार्क्स मिळतील त्याचा काही संबंधच रहात नाही. गरीबी श्रीमंतीवरून वाटण्या केल्या व श्रीमंतालाच परत ज्यास्त वाटा दिला तर ते गरीब वारसाला अन्यायाचे वाटणार.गरीब वारसाला ज्यास्त वाटा दिला तर दुसर्‍यांना ते अन्यायाचे वाटणार. जसे मृत्युपत्रात त्या माणसाची इच्छा व्यक्त केलेली असते तसे त्याच्या मृत्यू पश्चात काय योग्य हे कसे ठरवायचे ?
प्रत्येक माणसाचा दृश्य हेतू पुढे त्याच्या संततीची प्रगती व्हावी असाच असतो. कोणाची किती प्रगती होऊ शकते ह्याचे काही आडाखे आपण बांधू शकत नाही. कोणी कवी मृत्यू पावला व त्याचा अंश पुढच्या पिढीत रहावा अशी योजना करू म्हटले तर त्याच्या मुलांत कोण चांगला कवी होऊ शकतो हे पहावे लागेल.पण प्रत्यक्षात अंदाजाप्रमाणे किंवा परीक्षेप्रमाणे कोणाची प्रगती होते हे बेभरवशाचे असते. शिवाय कवी असलेल्या माणसाची धन्यता त्याची मुलेही कवी झाल्याने होते की ते डॉक्टर , इंजिनियर झाल्याने होते हे कसे व कोण ठरवणार ? एका माणसाचा डिएनए पुढच्या पिढीत काय झाल्याने प्रगत डिएनए होईल ह्याला काही अदमास नाही. मग सर्वच पुढच्या पिढीच्या डिएनए ज ना सारखे हिस्से दिले तर त्या सर्वांना सारखे प्रोत्साहन दिल्यासारखे होईल. व मग त्यातूनच कोणा तरी वारसाचा डिएनए वाढीस लागेल व मृत्यू पावलेल्या डिएनए ला धन्य वाटेल. हेच असेल समान वारसा हक्काचे तत्व ?

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
the bhalerao

Sunday, May 23, 2010

द भालेराव-६

बदलती घरे, घरांचे बदलणे !

जे पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात त्यांना वाटते ह्या जन्मी माझा वास ह्या शरीरात आहे. त्या अगोदर कदाचित माझ्या आजोबाच्या शरीरात वास असेल, त्या अगोदर कदाचित पणजी आजीच्या शरीरात असेल. असेच असते आपले निरनिराळ्या घरा घरात राहणे.जसा जीव रमतो, त्या त्या काळच्या देहात, तसेच आपले रमणे असते, वेगवेगळ्या घरात.
पण त्या त्या वेळी वाटत असते की कैक वर्षांपासून आपण ह्याच घरात राहतो आहोत. आणि त्या त्या घराची मग आपल्याला ओढ लागून राहते.
आता घाटकोपरच्या घरातच मला वाटते मला तीस वर्षे झालीत. आता इथेच...असे वाटू लागते न लागते तोच आठवते की त्या अगोदर दहा वर्षे इथेच जवळच्या घरात गेली होती. खरे म्हणजे सर्व प्रगती, मुले, त्यांची शिक्षणे, सुबत्ता, पाहुण्या रावळ्यांची वर्दळ वगैरे ह्याच घरात नांदली होती.
पण ह्या घरा अगोदर, ह्या घराची मुहूर्तमेढ रोवली गेली होती, कालीनाच्या घरात. केवढेसे छोटे घर, पण अगदी सोईचे. खरे तर हे होते ट्रेनी इंजिनियरांचे हॉस्टेल.पण बाल्कनीला आत घेऊन स्वयंपाकघर केलेले होते. ह्या घरातच माझ्य़ा मुलीचा जन्म झालेला होता.
आणि त्या अगोदरचे डोंबिवलीचे घर तर विसरणे अशक्यच. अवघ्या दोन खोल्या, स्टेशनपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर,गावाबाहेरच्या गोठया जवळ. पाणी विहीरीचे काढावे लागे. ह्याच घरात पत्नीचे पहिले गर्भारपण झाले. आयुष्या खडतर तर होतेच पण त्यातही एक गंमत होती. बॅंकेतले पहिले खाते इथेच काढणे झाले.
पुण्यातली एरंडवण्यातली खोली तर अगदी स्वप्नवतच होती. टुमदार बंगला व वर ऍटिक सारखी खोली. एका सडया माणसापुरती असलेली ही खोली पण ह्यात भास्करराव खरवडकर एम.डी.चा अभ्यास करायला राह्यले होते,चांगले तीन महिने. रमाकांत देशपांडे, प्रकाश खरवडकर वगैरे मित्रमंडळीही वरचेवर येत असत.
त्या अगोदर सहा महिने मी सन्मित्र कॉलनीतल्या घरात होतो. लेक्चररची नोकरी कधी एकदा सोडतो व घर कधी सोडतो असे झाले होते तेव्हा. अर्थात त्या घराचा त्यात काहीच दोष नव्हता. उलट ते माझ्या वडिलांचे सगळ्यात चांगले घर होते. त्यांचे त्या अगोदरचे चौधरी बंगल्यातले घर तर एखाद्या भुलभुलैय्या सारखेच होते. गच्चीवरच्या रंगीबेरंगी आरसे महालात मॅट्रिकचा अभ्यास करायला खूपच मजा आली होती. शिवाय खादीचे कपडे प्रशस्त हौदाजवळ टिनोपालने धुताना माझी जी तंद्री लागे ती एखाद्या अध्यात्मिक ध्यानाच्या तोडीची असायची.
त्या अगोदरच्या हैद्राबादच्या काचीगुड्याच्या घरात माझे पाचवी ते नववी पर्यंतचे शिक्षण झाले होते. ह्या घराची आठवण होते तेव्हा माणसांचे प्रचंड मोठे घोळके आठवतात. पाहुणे रावळे, कार्यकर्ते, विद्यार्थी, त्यांची क्रिकेटची टीम, त्यात माझे विकेट कीपींग असे प्रचंड घाई गर्दीचे दिवस आठवतात. त्यातच टेबलाखाली बसून दिवाळी अंकांचा हस्तलिखितातला साहित्य ठेवा मी वाचीत असे, गुपचूप.
त्या अगोदरचे प्राथमिक शिक्षणा दरम्यान घर होते सुलतान बाजारात. पारगावकरांच्या शेजारी. इथून शाळा अगदी जवळ असल्याने, शाळा सुटल्यानंतर मोकळ्या शाळेत खेळण्याचा अनोखा आनंद मला मिळाला. ह्या घराचा उंचच उंच जिना व त्यावरूनचे घसरणे मला चांगलेच आठवते. त्या अगोदरचे घर होते गामजी बिल्डींग मधले. पंधरा वीस बिर्‍हाडं एका बंगल्यात असलेली ही वास्तू. हीत अगदी अनोखी बाब होती, ती म्हणजे कम्यनिटी संडास. दहा पंधरा जणं, एकदम बसतील असा एवढा मोठा चराचा संडास.
त्या अगोदरचे आठवणारे घर म्हणजे आजोबांचे खंडाळ्याचे. प्रचंड मोठा वाडा. प्रवेशालाच एक धनगर जोडपे राखणदारासारखे रहात असे. त्यांचे लग्नही मला चांगले आठवते. माझी आजी चिंध्यांचा चेंडू करायची व माझे काका लोक त्याने धप्पाकुट्टी नावाचा खेळ खेळत. आजोबांच्या भजनाला आलेली मंडळी एकत्र परातीने चहा पीत असत.
अबब ! नुसती आठवणारी घरे वरची मोजली तर भरतील,बारा. आणि शिवाय पुण्याला माझी आत्ताची दोन घरे मोजली तर भरतील तेरा. आणि जनरीती प्रमाणे एक दिवस ही सगळी घरे सोडून मला जावे तर लागणारच आहे. मी कितीही कोणत्या घराबद्दल ममत्व जपले तरी !

अरूण अनंत भालेराव
९३२४६८२७९२
arunbhalerao67@gmail.com