Wednesday, June 20, 2018






Fafat एक Afat !
-----------------------------
गेली सात आठ वर्षे आम्ही ज्या बागेत संध्याकाळी भेटायचो त्यात मध्यवर्ती व्यक्तिमत्व होते फाफट ह्यांचे.
कधी ते जरा निराश वाटले तर आम्हीच त्यांच्या एका अफाट धैर्याची आठवण काढायचो त्यांच्यावर झालेल्या चाकूह्ल्ल्याची. त्या काळात मिल कामगारात प्रचंड हिंसा होत असे. त्यात नजरचुकीने त्यांच्यावर एके दिवशी चाकू-हल्ला झाला होता. वार इतका भयानक होता की सगळा कोथळा बाहेर आला होता. फाफटांनी मोठ्या हिमतीने स्वतःच्या हाताने बाहेर आलेली आतडी वगैरे आत ढकलली आणि हाताने जखम दाबून धरली. केईएम मध्ये सुद्धा त्यांना डॉक्टर  येईपर्यंत तसेच पोट दाबून धरावे लागले होते. मग दुसऱ्या दिवशी ते बॉम्बे हॉस्पीटल मध्ये गेले. त्या हल्ल्याची झालेली जखमेची खूण जेव्हा फाफटांनी दाखवली तेव्हा नुसते पाहूनही माझी गाळण उडाली होती. त्यांना मी गंमतीने नंतर धैर्यधर म्हणत असे !
फाफट ह्यांचा सेन्स ऑफ ह्युमर मोठा बेरकी होता. स्वतःवर विनोद करणे व त्यावर हसणे ह्याला विनोदाचे प्रचंड आकलन असावे लागते. त्यांच्या नावाचे स्पेलिंग FAFAT असे करताना ते म्हणत की जर तुम्ही पहिले A गाळलेत तर आफत येईल !
त्यांचे किस्से व विनोद आम्ही कायमच आठवत राहू आणि त्यांच्याच स्टाईल मध्ये म्हणावे वाटते की केवळ ह्या सेन्स ऑफ ह्युमर पायी त्यांना चित्रगुप्त स्वर्गात घेईल !
त्यांच्या स्मृतीला भावभरी श्रधांजली !
------------------------------------     

Saturday, June 16, 2018





दा.गो.--- एक सिनिक था
------------------------------------- 
दा.गो.देशपांडे हे खरे तर माझ्या वडिलांचे मित्र. पण त्यांना मित्र म्हणता येईल इतके त्यांचे प्रेम माझ्या वाट्याला आले होते. इंग्रजीत “गार्डियन एन्जेल” अशी एक  कल्पना आहे. तीत कोणी एक देवदूत आपले रक्षण करतो आहे, अशी योजना दाखविलेली आहे. दा.गो. हे सगळ्याच अर्थाने माझे गार्डियन एन्जेल होते. माझ्या मूर्खपणाने माझी जेव्हा पुण्यातली नोकरी गेली, तेव्हा मी मुंबईला मेट्रो समोरच्या दा.गों च्या ऑफिसात उभा राहिलो आणि मला काहीही न सुनावता, त्यांनी मला मुकंद कंपनीत नोकरी देवविली. त्याला आज बावन्न वर्षे झाली !
दा.गो. त्याकाळी “सिनिक” ह्या नावाने छोटेखानी कथा लिहीत , ज्याला ते सिनिकथा असे संबोधित. त्यांचे हे सिनिक असणे मोठे विलोभनीय होते. लोक स्वार्थीपणे वागतात असे मानणारा तो सिनिक, असा एक सिनिकचा अर्थ शब्दकोशात देतात आणि स्वतःच्या दिलदार वागण्याने त्यांनी तो सार्थ केला.
स्वतः नास्तिक असल्याचे ते दाखवत, पण त्यांनी बायकोला त्यांच्या पूजा अर्चा सकट जो मान दिला तो त्यांचा मोकळा स्वभाव मोठा लुभावणारा होता. ते स्वतः जसे मनमानी तसेच त्यांनी मुलांचे मनमानीपण अपार प्रेमाने जपले होते.
खणखणीत मोठ्या आवाजात “अरे, केव्हढी ही ढेरी !” असे चक्क समोर म्हणणारा आवाज जरी आज लुप्त झाला असला तरी ते माझ्यावर सदैव गार्डियन एन्जेल सारखे लक्ष देऊन असतील, अशी माझी खात्री आहे.
त्यांच्या कुटुंबियांना त्यांचा विरह सुसह्य होवो हीच प्रार्थना व श्रद्धांजली.
----------------------------

Thursday, October 5, 2017



विद्याधर पानट व प्रताप
माझे मेहुणे डॉ प्रभाकर पानट ह्यांचे भाऊ डॉ. विद्याधर पानट उर्फ नंदू पानट ह्यांचे दि २९ सप्टेंबर २०१७ रोजी कॅंसरने निधन झाले.
अतिशय मृदू स्वभाव व तशीच सौम्य प्रकृती असलेले नंदू पानट माझ्या मनात राणा प्रतापसाठी ठाम लक्षात राहिलेले आहेत. आणि काय योगायोग, त्यांचा फोटो शोधत असताना गुगलच्या इमेजेस मध्ये panat on Rana Pratap असे लिहिल्याबरोबर क्षणात मिळाला. त्यांनी राणा प्रताप वर जी असंख्य भाषणे दिली, त्यावर संशोधन केले त्याला मिळालेली ही पावतीच आहे.
इतकी सौम्य प्रकृती असलेल्या ह्या माणसाचे धैर्य अगदी वाखाणण्यासारखे आहे. त्यांनीच मला एकदा सांगितले होते की एका शुक्रवारी ( जुम्मा ) त्यांनी मशिदीत जाऊन राणा प्रतापवर व इतर विषयांवर भाषण दिले होते. भल्याभल्यांना न जमणारे हे काम आहे.
गावकरी, जळगाव आवृत्तीचे ते संपादक होते. अध्यात्मात तर त्यांची खूपच वरची तयारी होती.
त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी लता ह्यांना सांत्वनासाठी भेटायला जायची माझ्या पत्नीची खूप इच्छा होती पण राणा प्रतापाच्या करारी बाण्याने त्यांनी म्हणे लिहून ठेवले होते की माझ्या स्मरणात फक्त दोन झाडे लावा, इतर काही करू नका.
शेवटपर्यंत राणा प्रतापाचे प्रताप गाण्याराने तितक्याच करारीपणे जगाचा निरोप घेताना जो साधेपणा जपला त्याला कोटी कोटी प्रणाम व श्रद्धांजली.

------------------

Monday, August 28, 2017

वसंत पांडव
-------------------
औरंगाबादचे गव्ह. आर्ट्स, सायन्स कॉलेज मोठे गंमतीशीर होते. एक वर्ग वर, तर दुसरा खाली व आसपास मोठ्ठाली झाडे होती. एकदा एका झाडाखाली तीनचार मुले अभ्यास करीत होती. पांढरा मांजरपाटाचा पायजमा-सदरा घातलेली गावाकडची मुले. ह्यांना काय येत असेल, बघू या तरी अशा आविर्भावात मी बघायला गेलो तर त्याच दिवशी शिकवलेल्या गणितातली अवघड गणिते ती मुले अगदी तोंडी सोडवत होती. ते पाहूनच मी त्याच क्षणी वसंत पांडवला मानला व माझी त्याची दोस्ती झाली.
त्याच्या मुलांनी औरंगाबादला सरस्वती भुवन मध्ये शिकावे अशी त्याची खूप इच्छा होती. पण काही नियमांनी ते तेव्हा जमले नाही.
मराठवाड्यातल्या मुलांसाठी खूप काही करण्याची त्याची तळमळ होती व त्याच्याच ध्यासापायी हा आपला स्मृती-गंध ग्रुप स्थापन झाला व वाढला.
तो जाणार हे तर सर्वांना कळलेच होते. तसे, तर आपण सगळे आपली वेळ आली की जाणार आहोतच, पण वसंत सारखे काही तरी ध्यास घेऊन काही करणे हे एखाद्यालाच जमते व त्याचसाठी त्याला श्रद्धांजली वाहताना थोडेफार आपल्यालाही जमो, अशी प्रार्थना करू यात !

---------------------   

Tuesday, August 1, 2017

कै. दुर्गामामी, सौहार्दाचा पुतळा,
----------------------------------------
लहानपणापासून मला जरा प्रौढ व्यक्तींचा सहवास लाभलेला होता. हैद्राबादला आमच्याकडे जवळ जवळ एक क्रिकेट टीम भर विद्यार्थी होते. त्यातले माझे काका मेडिकलला, मनोहर व्हेटरनरीला, तर दत्तामामा एम ए ला होते. ( आणि मी सातवीला.). ह्या सगळ्यात अगदी मवाळ, सौजन्यपूर्ण व हळवे असे होते दत्तामामा. त्यांचे सगळे काम अगदी टापटीपीचे असायचे. कंदिलाची काच अगदी लख्ख पुसायचे. अभ्यास तर अगदी शिस्तपूर्ण असायचा. साने गुरुजींना मी काही पाहिले नव्हते, पण दत्तामामांसारखेच ते दिसत असणार असे मी ताडीत असे. कारण दोघेही साक्षात मृदूपणाचे आदर्श असे.
दुर्गामामी जेव्हा मॅट्रिकला होत्या तेव्हा कसल्या तरी स्पर्धेला सेलूहून हैदराबादला आल्या होत्या. अप्रतीम सात्विक सौंदर्य लाभलेल्या. पुढे त्यांचे दत्तामामांशी लग्न झाल्यावर त्यांच्याकडे मी काही दिवस राहायला जात असे. तेव्हा माझ्या मनात पक्के झाले की नुसतेच सात्विक सौंदर्य नाही, तर सौहार्दाचा पुतळा कोणाला करायचा असला तर खुशाल त्यांचा पुतळा करावा इतके ओतप्रोत सौहार्द त्यांच्या संसारात भरलेले होते. ते अगदी शेवटपर्यंत होते. त्यांच्या शेवटच्या आजारात मी काही भेटायला जावू शकलो नाही, पण माझा धाकटा भाऊ, निशिकांत सांगत होता की त्या स्वतः श्वासाच्या इतक्या त्रासात होत्या, तरी भेटायला आल्याबद्दल त्याला आभाराचे सांगत होत्या.
त्यांच्या सगळ्या कुटुंबातच जो सुस्वभावी लोकांचा भरणा आहे, त्याचा मूळ स्त्रोत त्याच आहेत हे मला अगदी मनोमन पटलेले आहे. आणि मूर्तिमंत सौहार्द कसे असते हे कोणालाही पहायचे असले तर केवळ त्यांच्याकडे पहावे !
त्यांच्या मुलांनी त्यांच्या आजारात खूप केले. पण आता ही सौहार्द-मूर्ति दिसणार नाही हे फार मोठे वैषम्य राहणार आहे !
त्यांच्या आत्म्याला शांती तर लाभोच, पण त्यांच्या स्मृतीनेही आमच्या वागण्यात थोडे तरी सौहार्द दरवळो  अशी प्रार्थना व त्यांना श्रधांजली !
-------------------------

     

Thursday, March 23, 2017

ज्येष्ठ ऋषी : गोविंद तळवलकर
गोविंद तळवलकर अण्णांना ( आमचे वडील कै अनंत भालेराव ह्यांना ) भेटायला बऱ्याचदा आमच्याकडे येत असत. अनंतरावांचे बरेच अग्रलेख ते महाराष्ट्र टाईम्स मध्ये पुनःमुद्रित करीत असत.
बऱ्याचदा अनंतरावांच्या भोवती असलेल्या गराड्याला टाळून ते दोघेच तासन तास बोलत असत. अशावेळी त्यांच्या गंभीर चेहऱ्यावरून काही तरी गहन विषय वा राजकारणावर खलबत चालले आहे असे ताडता येई.
तेच गोविंदराव मग साहित्यिकांच्या मैफिलीत आले की हास्यविनोदात रमत असत.
अण्णांचा अंगरक्षक असलेला प्रदीप चिटगोपकर हा अण्णांच्या बऱ्याच मित्रांना टोपण नाव ठेवीत असे. त्याने तळवलकर, व शिरवाडकर ह्यांचे टोपण नाव ठेवलेले होते: ज्येष्ठ ऋषी. हे अतिशय मार्मिक नाव ह्यासाठी होते की त्यांची ज्ञानोपासना एखाद्या ऋषीसारखीच होती. शिवाय तो मुंबईहून निघाला की तळवलकरांसाठी  व औरंगाबादी जाताना नाशिकला शिरवाडकरांसाठी  न चुकता Old Monk घेवून जात असे.

---------------  

Saturday, January 3, 2015


अजातशत्रू शिवाजी क्षीरसागर 
------------------------------------------
जगाच्या जीवन-मरण्याच्या नियमात काही तरी बिघाड झालेला असावा . नाही तर अजातशत्रू असलेल्या आणि सर्वाबाबत अतिशय चांगले विचार बाळगणाऱ्या शिवाजी क्षीरसागरला असे अकाली मरण यावे हे अघटितच म्हणायला हवे. 
मी , शिवाजी , शरद मान्नीकार, मधू जामकर हे आम्ही हैद्राबादच्या विवेक वर्धिनीचे पाचवीपासून दहावी पर्यंतचे वर्ग -बंधू . शालेय जीवनाच्या असंख्य आठवणी आमच्या एकमेकात गुंतलेल्या आहेत. शिवाजी आमच्या शाळेतला स्कॉलर होता. खरे तर त्या काळात अर्धा एका मार्काचा फरक झाला तरी मित्रात काय भांडणे व्हायची . पण शिवाजीच्या स्कॉलरशिपचे आम्ही आनंदाने कौतुक करीत असू व शिवाजीही तेवढ्याच आत्मीयतेने तेव्हाच्या तुटपुंज्या ( साधारण सहा किंवा दहा रुपये असेल ) स्कॉलरशिपमधून आम्हाला इडली डोसाची पार्टी देत असे . पुढे त्याने काही वर्षे शिक्षण सोडून मुंबईला रिझर्व बँकेत नोकरी पत्करली होती तेव्हाही मुंबईला गेले की आम्ही शिवाजीच्या दिलदार पाहुणचारावर ताव मारीत असू . 
शार्दुलला मुंबईत नोकरी लागली होती तेव्हा आमची चांगली गळाभेट झाली होती. औरंगाबादी गेल्यावर तर त्याची हमखास भेट घेतच होतो. शमिकाच्या लग्नाला पापा कोरटकर व सगळे जुने वर्गमित्र भेटल्याने अपार आनंद झाला होता. त्यानंतर त्याला अमेरिकेला जायला मिळाले त्याने खूप बरे वाटले होते. 
पण एकाएकी असले दुर्धर दुखणे व्हावे काय व त्यात त्याची प्राणज्योत निवावी काय हे फारच अन्याकारक आहे असेच वाटते . इतक्या अजातशत्रू माणसाला नेण्याची घाई व्हावी ही नक्कीच चूक आहे . हे काही बरे नाही !
--------------------------------  

Saturday, December 20, 2014

सौ ताराबाई मेढेकरांना सादर प्रणाम !




ज्या सबला निज भाव-बलाने करिती सदने हरिहर भुवने !

जगात सगळ्या योग्य गोष्टींची दखल घेतली जातेच असे नाही. विशेषतः स्त्री-पुरुष समानतेत आपण जरा चुकतोच !

सौ. ताराबाई मेढेकरांच्या बाबतीत तर मला ही चूक खूपच खंत देवून जाते. संसार करताना कमावून आणणे हे जेवढे महत्वाचे वाटते त्यापेक्षा मुलांचे संगोपन करणे, घर चालवणे हे कितीतरी जिकीरीचे असते हे आता कोणालाही पटावे इतके उघड आहे. आणि सौ. ताराबाईनी कमावणे व घर चालवणे ही दोन्हीही कामे यशस्वीपणे केलेली होती. पण त्यांच्या हयातीत त्यांचे मोठेपण आपल्याला जाणवले नाही. दागो देशपांडे म्हणतात तसे हे आपले करंटेपणच म्हटले पाहिजे.

त्याशिवाय परिस्थिती बेताची असली की आहे त्या वेळेत सर्व सहन करावे लागते. ताराबाई जेव्हा शिकल्या व नोकरी करीत तेव्हा ते काम तसे धाडसाचेच होते व लोकांची नाही नाही ती बोलणीही सहन करावी लागत. तशात त्यानी संसार यशस्वीपणे तर केलाच शिवाय जी थोर माणसे भेटली ( जसे कहाळेकर महाराज वगैरे ) त्यांचाही मान राखला.

अप्पांच्या पश्चात त्या लगोलग निघून गेल्या त्यात त्यांची भावनिक धृडता दिसून आली त्या भाव-बलाला सादर प्रणाम !

--------------------------------------------

Friday, October 11, 2013



----------------------------------------
सतीश मुळे ह्याचा विनोदी स्वभाव !
-----------------------------------------
सगळे चांगले असले की माणसाला विनोद सुचतात, पण सतीश मुळे असा वेगळा होता की अडचणीतही त्याला विनोद सुचत व त्यावर आम्ही अनेक वेळा हसलो आहे. त्याने अकाली जाऊन मात्र आम्हाला अडचणीत आणले आहे.
हा अगदी लहान असताना, म्हणजे पाचसहा वर्षांचा असताना, बाबुराव मामा ( त्याचे वडील ) त्याला हैद्राबादी घेऊन आले होते. त्यावेळी त्याला पायात मोठे मोठे बूट घालावे लागत असत. पण त्यातही तो त्याचा खेळकरपणा टिकवून होता. पुढे मेडिकल करताना तर केवळ त्याच्या कुशाग्र बुद्धीमुळे व स्मरणशक्तीमुळे तो डॉक्टरकी पूर्ण करू शकला. त्याला वाचायला खूप त्रास होई, तेव्हा त्याचे मित्र खोलीवर येऊन त्याला वाचून दाखवत व तेव्हढ्यावर ह्याने सगळ्या परिक्षा यथोचित पार पाडल्या होत्या. हे त्याचे यश फारच कौतुकास्पद आहे.
त्याला सिनेमा नाटकांची फार चांगली अभिरुची होती व त्यामुळे कुठलाही नवा हिंदी सिनेमा आला की हा त्या सिनेमातल्या डॉयलॉग्जवर इतकी टिंगल करी की त्यामुळे आम्हालाही विनोदाची, विडंबनाची जाण यायला लागली होती.
त्याचे वडील आमच्याकडे आले की आम्हा लहान मुलांची चांगलीच परिक्षा घेत व त्यातून सहीसलामत सुटणे हे फार जिकीरीचे काम असे. पण बाबुराव मामांचा वारसा चालवत सतीशने सर्व कौटुंबिक, सामाजिक जबाबदार्‍या यशस्वीरित्या व हसतमुखाने पार पाडल्या आणि आज मामा असते तर त्यांना त्याचा रास्त अभिमान वाटला असता.
सतीशच्या कुटुंबियांना ह्या संकटातून पार पडण्यासाठी बळ मिळो हीच प्रार्थना व सतीशला अनेक प्रणाम !
------------------------------------------

----------------------------------------
सतीश मुळे ह्याचा विनोदी स्वभाव !
-----------------------------------------
सगळे चांगले असले की माणसाला विनोद सुचतात, पण सतीश मुळे असा वेगळा होता की अडचणीतही त्याला विनोद सुचत व त्यावर आम्ही अनेक वेळा हसलो आहे. त्याने अकाली जाऊन मात्र आम्हाला अडचणीत आणले आहे.
हा अगदी लहान असताना, म्हणजे पाचसहा वर्षांचा असताना, बाबुराव मामा ( त्याचे वडील ) त्याला हैद्राबादी घेऊन आले होते. त्यावेळी त्याला पायात मोठे मोठे बूट घालावे लागत असत. पण त्यातही तो त्याचा खेळकरपणा टिकवून होता. पुढे मेडिकल करताना तर केवळ त्याच्या कुशाग्र बुद्धीमुळे व स्मरणशक्तीमुळे तो डॉक्टरकी पूर्ण करू शकला. त्याला वाचायला खूप त्रास होई, तेव्हा त्याचे मित्र खोलीवर येऊन त्याला वाचून दाखवत व तेव्हढ्यावर ह्याने सगळ्या परिक्षा यथोचित पार पाडल्या होत्या. हे त्याचे यश फारच कौतुकास्पद आहे.
त्याला सिनेमा नाटकांची फार चांगली अभिरुची होती व त्यामुळे कुठलाही नवा हिंदी सिनेमा आला की हा त्या सिनेमातल्या डॉयलॉग्जवर इतकी टिंगल करी की त्यामुळे आम्हालाही विनोदाची, विडंबनाची जाण यायला लागली होती.
त्याचे वडील आमच्याकडे आले की आम्हा लहान मुलांची चांगलीच परिक्षा घेत व त्यातून सहीसलामत सुटणे हे फार जिकीरीचे काम असे. पण बाबुराव मामांचा वारसा चालवत सतीशने सर्व कौटुंबिक, सामाजिक जबाबदार्‍या यशस्वीरित्या व हसतमुखाने पार पाडल्या आणि आज मामा असते तर त्यांना त्याचा रास्त अभिमान वाटला असता.
सतीशच्या कुटुंबियांना ह्या संकटातून पार पडण्यासाठी बळ मिळो हीच प्रार्थना व सतीशला अनेक प्रणाम !
------------------------------------------


Sunday, September 15, 2013



---------------------------------------
सुधाताई काळदाते
-----------------------
मी तेव्हा मॅट्रिकला होतो. औरंगाबादच्या स्टेशनावर त्यांना घ्यायला गेलो होतो. त्या अगोदर हैद्राबादी असताना बापू काळदाते आमच्याकडे येत असत. तेव्हा आमच्या बैठकीच्या खोलीत एक टेबल असे. त्याखाली बसून मी जे काहीबाही वाचे त्यात मी बापूंच्या फाईलीतली त्यांनी सुधाताईंना लिहिलेली प्रेमपत्रेही वाचलेली होती. बापूंच्या पत्रांचा मायनाच मोठा रोमांचकारी असे. ते लिहीत: "प्रिय सु".
त्यावरून कोणीतरी सुंदर नखरेल मुलगी असावी असे वाटून मी त्यांची वाट पाहात होतो. तर, ह्या बाई आपले सामान स्वत: उचलत, टांगेवाल्याला पत्ता सांगत होत्या व मला पुढे टांगेवाल्याशेजारी बस म्हणत बसल्याही. मध्येच अर्ध्या वाटेवर त्यांच्या लक्षात आले की त्यांचा होल्डऑल गाडीतच राहिला होता. त्यांनी लगेच टांगा परत वळवायला सांगितला. त्या काळात डब्यांबर काही पाच आकडी नंबर असत व त्यांनी आपल्या डब्याचा नंबर लिहून ठेवलेला होता. त्यांनी स्टेशन-मास्तरांना सांगून पुढील स्टेशनावर तो होल्डॉल उतरवून घ्यायची व्यवस्था केली होती. संसार थाटायला औरंगाबादी आलेली एक स्वप्नाळू मुलगी ( प्रसिद्ध रविकिरण मंडळाचे कवि वा.गो.मायदेव ह्यांची मुलगी ) प्रत्यक्षात हे अवघड काम सहजी फत्ते करून दाखवीत होती. पहिल्याच दिवसांपासून मी सुधाताईंचे हे कर्तृत्व पाहिलेले होते.
पुढे त्यांनी औरंगाबादच्या आजूबाजूच्या खेड्यात सामाजिक कार्यकर्ती म्हणून जे काम केले त्याची रोजची वर्णने त्या आम्हाला रात्रीच्या शिळोप्याच्या गोष्टींसारख्या सांगत असत. आज एका बाईने उगाच उपदेश करू नकोस, भाकर्‍या करून देतेस का असे म्हणून कसे आवाहन दिले होते ते एक दिवस त्या सांगत व त्याचबरोबर तिथेच तिला कशा भाकर्‍या करून दिल्या त्याचेही वर्णन त्या खेळीमेळीने सांगत असत.
बापू त्या काळी राजकारणात भटकंती करीत असताना, नोकरी, पिएच.डी व दोन मुलींची देखरेख त्या कशी करीत असत हे मी फार जवळून पाहिलेले आहे. कांचन लहान असताना मी तिची तासन्‌ तास सोबत केलेली आहे. आदर्श जोपासणे व संसारही नेकीने प्रेमाने कसा करावा ह्याचा वस्तुपाठच त्या वेळी आम्हाला देत होत्या.
एकदा वा.गो.मायदेव औरंगाबादी आलेले असताना त्या काही कारणांनी दु:खीकष्टी झालेल्या असताना मला सांगत होत्या की अपेक्षा केल्या ना की दु:ख होतेच ! काळाच्या पाशात अडकून न राहता आपला आदर्श संसार कसा करावा हेच त्यांनी आपल्या जगण्याने दाखवून दिले होते. जणु काही वडिलांच्या ( वा.गो.मायदेवांच्या ) एका प्रसिद्ध कवितेच्या ओळींसारखे :
" हे पंजरस्थ पक्षा, नुसते कशास गाशी ?
हो काय, गाऊनिया, गुंतून काळपाशी ! "
काळाच्या पाशाला तोडून काळाचे दान देणार्‍या सुधाताई काळदातेंचे स्मरण मला कायमच होत राहील , होत राहू दे !
-------------------------------------------

Thursday, November 17, 2011

सु-बापू काळदाते
मराठीत शब्दाच्या आधी सु हा प्रत्यय आला की त्या शब्दाचा अर्थ चांगलाच होतो असे आढळते. बापू काळदाते ह्यांनाही सु ( सुधाताई ) च्या टापटिपीचा प्रत्यय आला तेव्हाच त्यांचे जीवन चांगल्या अर्थाचे झाले असावे. बापूंबरोबर सुधाताईंची आठवण होण्याचे कारण बापू तेव्हा एक सेवादलाचे कार्यकर्ते म्हणून हैद्राबादी आमच्याकडे आले होते. खादीचे कपडे, एक शबनम बॅग व खळखळून बोलणे, हसणे ह्यांनी तेव्हा आमच्या घरावर त्यांचा खूपच प्रभाव पाडला होता. बैठकीत गप्पा चालत तेव्हा कोपर्‍यातल्या टेबलाखाली बसून मी काहीबाही वाचत असे व गप्पांकडे लक्ष ठेवून असे. बापूंची पिशवीही टेबलाजवळच होती. सातवीतल्या मुलाच्या उत्सुकतेला त्यातली एक फाईल बघाविशी वाटली. आणि आदर्श प्रेमपत्रे कशी असावीत त्याचा वस्तुपाठच मला वाचायला मिळाला. बापू व सुधाताईंनी एकमेकाला लिहिलेली प्रेमपत्रे त्यात नीट फाईल केलेली होती. त्यावेळेस सुधाताई सु हे टोपणनाव वापरीत असाव्यात, कारण पत्रांच्या मायन्यात "प्रिय सु" असे असायचे.
पुढे सुधाताईंचे बापूंशी लग्न झाल्यावर त्या पहिल्यांदा औरंगाबादी आल्या तेव्हा त्यांना आणायला रेल्वे-स्टेशनवर मीच एकटा गेलो होतो. आता मी मॅट्रिकला होतो. त्या पहिल्या भेटीतच सुधाताईंचे वेगळेपण अनुभवायला आले. आम्ही रीतसर स्टेशनबाहेर येऊन टांग्यात बसलो ( त्याकाळी घोड्याचे टांगेच होते ), अर्ध्या रस्त्यावर आलो आणि सुधाताईंच्या लक्षात आले की एक होल्डऑल उतरताना काढून घ्यायचाच राहिला. आम्ही परत स्टेशनवर गेलो. सुधाताईंनी डब्याचा नंबर टिपून घेतलेला होता. तोंवर डब्यांना नंबर असतात हेही मला माहीत नव्हते. स्टेशनमास्तरला सांगून त्यांनी पुढच्या स्टेशनवर तो होल्डऑल काढून घेऊन तो परत पाठवण्याची व्यवस्था करून घेतली आणि संध्याकाळपर्यंत तो होल्डऑल औरंगाबादी पोचलाही. त्याकाळी रेल्वेकडून असले अचाट कर्त्तत्व करवून घेणा‍र्‍या त्या एक धाडशी महिला होत्या.
बापू जरी राजकारणातल्या रुक्ष व्यवहारात गुंतलेले असायचे तरी त्यांनी रसिकता चांगलीच जपलेली होती. आणि ते त्यांच्या सेवादलात असण्यापासून दिसत होते. वसमतला वीस दिवसांचा सेवादलाचा कॅंप होता. त्याला मी होतो. आता कॅंपचे सगळे कार्यक्रम बापूंनी रीतसर घेतले व त्यात कमाल म्हणजे त्यांनी आम्हा मुलांना तिथून नांदेडला नेले, आठवडाभरासाठी. तिथे नरहर कुरुंदकर आम्हाला जीवनराव बोधनकरांच्या घरी, रोज दोन तीन तास, मर्ढेकरांच्या कविता समजावून सांगत. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना त्या काळात एका सेवादलाच्या कार्यकर्त्याने नरहर कुरुंदकरांसारख्या व्यासंगी साहित्यिकाकडून, मर्ढेकरांच्या कवितांची ओळख करून द्यावी, ह्यात त्यांच्या रसिकतेची प्रगल्भ जाणच दिसून येते आणि इथे परत हे वा.गो.मायदेव ह्या प्रसिद्ध कवीची मुलगी असलेल्या सुधाताईंचे त्यांना प्रत्यय असल्याने झाले असावे, हेही उघड होते.
राजकारणात नुकत्याच पदार्पण करतानाचे बापूंचे उमेदीचे दिवस ( एका विद्यार्थ्याच्या नजरेने ) मी अगदी जवळून पाहिले आहेत. जेव्हा पब्लिक-स्पीकींग म्हणजे काय असते हे कोणालाही माहीत नव्हते, तेव्हा बापू एखाद्या भाषणाची तयारी आरशासमोर उभे राहून तासन्‌ तास करताना मी पाहिलेले आहे. एखादे कसब कमवायचे तर त्याचा शास्त्रोक्त अभ्यास व सराव करावा हा दृष्टिकोनच मोठा उमदा आहे. असेच समाजवाद कसा असावा, हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाह्यला मिळालेले ते एक अपवादात्मक समाजवादी आहेत. कारण त्या काळात ते इस्त्राईलला जाऊन त्यांच्या पंतप्रधानाला, बेन गुरियान, ला भेटून आले होते. त्यांनी सांगितलेली एक समाजवादाची प्रचीती मला अजून लक्षात आहे. बापूंची भेट झाल्यावर बेन गुरियान बापूंना कारने पोचवायला आले होते व नंतर स्वत: बसच्या लाइनीत उभे राहिले होते. आजकालच्या बरबटलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर तर वाटते, समाजवाद असावा तर असा !
त्या काळात समाज कार्याला झोकून दिलेले हे मोठे मोहक दांपत्य होते. बापू दौर्‍यात व्यस्त असत, तर सुधाताई खेड्यापाड्यांनी सोशल वर्करचे काम करीत असत. त्या दरम्यान त्यांच्या पहिल्या मुलीचे, कांचनचे, संगोपन करण्यात मला खारीचा वाटा उचलायला मिळाला ह्याचे मला खूप अप्रूप आहे. ज्यांनी एका ध्येयापायी आपला संसार पणाला लावला, त्यांना देवाने सोन्यासारख्या मुली द्याव्यात, हा दैवी न्यायच म्हणायला हवा ! असेच त्याने सुधाताईंना बळ व बापूंच्या आत्म्याला शांती द्यावी !

----------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

-----------------------------------------------------------------

Monday, November 14, 2011

अभिमान बाळगावा असे डॉ.अहंकारी
६ नोव्हेंबर २०११ ला औरंगाबादी "अनंत भालेराव-स्मृती-पुरस्कार" डॉ.शशिकांत अहंकारी ह्यांना देण्यात आला. डॉ.अहंकारी व त्यांच्या गायनॅकॉलॉजिस्ट पत्नी डॉ.शुभांगी अहंकारी हे दांपत्य, एका खेड्यात ( अणदूर, तुळजापूर तालुक्यात, उस्मानाबाद जिल्ह्यात, सोलापूर पासून ४० किमी वर हे खेडे आहे) एक अतिशय मोलाचे काम करीत आहेत. त्याचा हा सन्मान आहे. हा २३वा वार्षिक स्मृती-पुरस्कार ह्या आधी निरनिराळ्या क्षेत्रातल्या प्रथितयशांना मिळालेला आहे, जसे: कुमार केतकर, वसंत पळशीकर, अप्पा जळगावकर, गोविंद तळवलकर, ना.धों.महानोर, मंगेश पाडगावकर, वगैरे.
अणदूर ह्या खेड्यात अहंकारींनी हॅलो ( हेल्थ ऍंड ऍटो लर्निंग ओर्गनाइझेशन ) नावाची संस्था काढली आहे. डॉ.अहंकारी औरंगाबादच्या मेडिकल कॉलेजात विद्यार्थी असतानाच युक्रांद वगैरे सारख्या चळवळीतल्या मित्रांना घेऊन सुट्ट्यात स्वयंसेवी आरोग्य सेवा आसपासच्या खेड्यात पुरवत असत. पुढे डॉक्टर झाल्यावर ह्या कामाची पूर्णवेळी सुरुवात त्यांच्या आईच्या नावे काढलेल्या "जानकी रुग्णालया"ने झाली व सध्या त्यांचा "भारत-वैद्य" नावाचा प्रकल्प सरकारनेही वाखाणला आहे. गावोगावच्या खेड्यापाड्यातून थोड्याशा ( इयत्ता ८ ते १२) शिकलेल्या स्त्रियांना ते ५० दिवसांच्या प्रशिक्षणात प्राथमिक आरोग्याचे व विशेषत: माता-बाल-संगोपनाचे प्रशिक्षण देतात. ह्यांना ते "भारत-वैद्य" म्हणतात. अशा ७५ भारत-वैद्य स्त्रिया ७० खेड्यापाड्यातून अवघ्या पाच रुपये/दर रुग्णामागे, एव्हढ्या अल्प खर्चात, हे आश्चर्यकारक काम करतात. ह्याबाबतीत त्यांचा एक नाराच आहे: "एसटीच्या खर्चात, उपचार गावात".मग ह्या भारत-वैद्य स्त्रिया त्यांच्या गावात घरोघरी जाऊन प्राथमिक आरोग्य-सेवा देतात. हे काहीसे चीनच्या बेअर-फुट डॉक्टर्स सारखेच आहे. ह्या मूलभूत प्रशिक्षणाला हलके लेखू नका. कारण ह्या मूलभूत ज्ञानामुळे लबाड डॉक्टरांची ह्या खेडवळ स्त्रिया कशी बोबडी वळवतात त्याचा एक किस्सा ऐका. एका मुलाच्या पोटात खूपच दुखत असते. प्राथमिक उपचाराने बरे वाटत नाही. मग शेजारीपाजार्‍यांच्या मदतीने ती भारत-वैद्य त्याला शहराच्या ठिकाणी घेऊन जाते. शहरातला डॉक्टर म्हणू लागतो ह्याच्या पोटात डावीकडे जे दुखते आहे ते ऍपेंडिक्स मुळे व ते फुटायच्या आत त्याचे ऑपरेशन करणे जरूरीचे आहे व त्याला साधारण दहा हजार खर्च येईल. भारत-वैद्य म्हणते की आम्हाला शिकवले आहे की ऍपेंडिक्स तर उजवीकडे असते तर मग हे दुखणे ऍपेंडिक्सचे कसे असेल ? त्या पोराचे दुखणे मग दुसर्‍या डॉक्टराकडून मिटवल्या जाते व लबाड डॉक्टरांची लबाडी एका प्राथमिक आरोग्याच्या शिक्षणाने उघडकीला येते.
स्त्रियांविषयीच्या अपार कणवेपायी डॉक्टर अहंकारी दांपत्याने अडाणी स्त्रीलाही समजेल अशा चाचण्या अमलात आणून रूढ केल्या आहेत. जसे एकदा एका मुलीने एका भारत-वैद्याला विचारले होते की "एचबी" म्हणजे काय ? त्यावर मग डॉक्टरांनी हेमोग्लोबीनचे गरोदरपणातले महत्व समजावून सांगितले व भारत-वैद्यांना शिकविले की फक्त बाळंतिणीची नखे बघा. ती फिकी असतील तर हेमोग्लोबिन कमी आहे, लोहगोळ्या द्या, लालसर असतील तर ठीक आहे. शोधाची जननी गरज असते, हेच इथे पहायला मिळते. असेच त्यांच्या प्रशिक्षणादरम्यान ते जे अभिनव प्रयोग योजतात त्याला दाद द्यावी. उदाहरणार्थ स्त्रीची शरीर-रचना समजावताना ते फरशीवर बाईची आकृती खडूने काढतात व मग त्यात यकृत, किडनी, योनी वगैरे अवयव रंगीत खडूने भरतात. हा ग्रामीण ऍनॉटॉमीचा वर्ग मोठा मनोहारी वाटतो व प्रभावीही.
डॉ. अहंकारींनी अतिशय कल्पकतेने "माता-दत्तक-योजना" तिथे राबवली आहे. वस्तीतल्यांच्या मदतीने तिथली भारत-वैद्य स्त्री गरोदर मातेला दत्तक घेते. तिने १२ आठवड्याच्या आत दवाखान्यात नाव नोंदवले का नाही, धनुर्वाताची तीन इंजेक्शने घेतली की नाही, शंभर लोहगोळ्या घेतल्या की नाही व योग्य आहार वेळच्या वेळी घेतला की नाही ही अगदी प्राथमिक आरोग्याची काळजी वाहते. ह्या जुजबी काळजीमुळे माता-बालक-मृत्यूचे प्रमाण घटते, व आयुष्याची सुरुवात नेमकी व विश्वासक होते. ह्यामुळेच सोलापूरच्या गरीब वस्त्यात ते ह्या चळवळीचे नाव "शुअर स्टार्ट" असे ठेवतात जे अतिशय चपखल असेच आहे.
सोलापूर हे अणदूरजवळ असलेले मोठे शहर. अहंकारींनी इथल्या झोपडपट्टीसारख्या गरीब वस्तीत मोठा यशस्वी उपक्रम राबवला आहे. ८० वस्त्यातील २ लाख स्त्रियांना बचतगटाच्या माध्यमातून आरोग्यसेवा पुरवल्या आहेत. बचतगटामार्फत स्त्रियांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन दिल्या जाते. गाई, म्हशी, दळण-कांडणाची लहान यंत्रे, दुकानांसाठी मदत वगैरे. ह्यासंबंधी अहंकारींचा अनुभव अगदी ह्रद्य आहे. एका बाईने बचत गटाकडून एक गाय घेतलेली असते. त्यासाठी तिने बचत-गटाला अवघे ६० रुपये भरलेले असतात. पण तिच्या नवर्‍याला तिने त्याची परवानगी न घेता हा कारभार केला हे आवडत नाही. तो तिला बेदम मारतो व घरातून काढून टाकतो. ह्यावर ती बाई, डोळे पुसते व गाय घेऊन जाऊ लागते. नवरा म्हणतो, गाय कशाला नेतेस ? त्यावर ती म्हणते बचत गटाने दिलीय, त्यांची त्यांना परत करते व जाते. ह्या अनुभवातून आत्मसन्मानासाठी स्त्रिया कशा तयार होत आहेत त्याचेही समाजाला भान यावे.
स्त्री-भ्रूण-हत्या विरोधात काम करीत असताना डॉ. अहंकारी एक विदारक प्रसंग सांगतात, ज्यामुळे कोणाही पुरुषाला लाज वाटावी. त्यांची एक कार्यकर्ती असते. ती सरपंच म्हणून निवडून येते. नवर्‍याचा प्रथम पाठिंबा असतो. पण नंतर तिच्या कामामुळे तिचे जागोजागी सत्कार व्हायला लागतात. ते सहन न होऊन मग तो तिला मारहाण करायला लागतो. बाईला एके वेळी भर सभेत तिच्या पाठीवरचे वळ दाखवावे लागतात. ह्या पुरुषी अहंकारामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना आजही प्रचंड त्रास होतो. कदाचित ह्या पुरुषी अहंकाराची सतत जाणीव रहावी म्हणूनच स्वत: अगदी निर-अहंकारी आणि कोणीही अभिमान बाळगावा असे ते असूनही डॉक्टरांनी अहंकारी हे आडनाव अजूनही जपले असावे.
असेच ग्रामीण भागात जी माणूसकी गरीबीमुळे जपली जाते त्यावर शहरी मध्यमवर्गीयांनी विचार करावा अशी घटना अहंकारींच्या कामात घडलेली आहे. ती अशी: एका बाईला तिच्या वस्तीत, कचर्‍यात एक नवजात मूल टाकून दिलेले सापडते. सगळ्या आजुबाजूच्या बायका, भारत-वैद्य, एकत्र येऊन ठरवतात की ह्या मुलीला सगळी वसतीच दत्तक घेईल व ह्या वसतीतच वाढवील. ज्याने टाकून दिलेय त्याच्या देखत. मग सगळ्याजणी मिळून पोलिसात जाऊन, रीतसर कारवाई करून, ती मुलगी वाढवितात, तिचा दरवर्षी वाढदिवस साजरा करतात. शहरातल्या संवेदनाशून्य झालेल्या वागण्यावर हे झणझणीत अंजनच जणू. ग्रामीण कळवळीचा पाठ शहरी जनतेने गिरवावा असेच हे कर्तृत्व आहे !
बाबा आमटे, गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव ह्यांच्या पाठबळाने डॉक्टर अहंकारी ह्यांचा समाजकार्याचा आवाका खूपच मोठा झालेला आहे. त्यांचे व्हिजन-वाक्यच मुळी आहे: निरोगी, स्वावलंबी व न्यायी समाज. आणि ह्यासाठी संस्थेचे व्रत ( मिशन ) त्यांनी ठेवले आहे: दुर्लक्षित घटकांचे संघटन, संस्था व शासन ह्यांच्यात समन्वय, व वैज्ञानिक दृष्टिकोनातून निरोगी व स्वावलंबी समाज निर्माण करणे. ह्या आवाक्यामुळे त्यांच्या उपक्रमात अंतर्भूत आहेत : सावली केंद्र ( स्त्रियांवरील हिंसाचार रोखण्यासाठी हस्तक्षेप ); किशोरी प्रशिक्षण ( शिवण क्लास, छंदवर्ग, वाचनालय, सायकल चालविणे, वगैरे ); कलापथक ( लोककलेतून आरोग्य संवाद साधण्यासाठी ह्यात बालविवाह, व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रूणहत्या, विरोधी जनजागरण केले जाते ); ग्रामीण विज्ञान केंद्र ( ३० विद्यालयातील ८०० विद्यार्थी विज्ञान-प्रयोग शाळेचा लाभ घेतात. विज्ञान वाहिनी पुणे, व दुर्गादेवी ट्रस्ट पुणे त्यांना मदत करतात ); शाश्वत शेती ( सेंद्रीय शेतीचा प्रचार व प्रयोग ह्यासाठी १० गुंठे शेतीत महिलांना शेतीव्यवसायातल्या प्रयोगांची ओळख करून देण्यात येते);
डॉ. अहंकारींच्या अनेक प्रकल्पांना नामवंत संस्थांचे पाठबळ मिळते आहे. त्यात ऑक्सफॅम, फोर्ड फौंडेशन, युनिसेफ, स्विस-एड, सिद्धिविनायक ट्रस्ट, महाराष्ट्र फौंडेशन, व पाथ ह्या सेवाभावी संस्था त्यांच्या प्रकल्पांचा मरातब वाढवतात. "भारतवैद्यक डायरी आरोग्याच्या विकासाची" हे पुस्तक ग्रंथाली वाचक चळवळीने प्रकाशित केले आहे. तसेच युनिक फीचर्स तर्फे "खरेखुरे आयडॉल्स"मध्येही अहंकारी ह्यांचा अंतर्भाव आहे. "वेगळ्या वाटांचे प्रवासी" ह्या साकेत प्रकाशनातही त्यांची माहीती आहे. पाहता पाहता ह्या कार्याला आता १५ वर्षे होत आली आहेत. जिथे शहरातून अहंकारींचा सत्कार होतो वा सभा होतात त्याला ते त्यांच्या खेड्यातल्या १५/२० स्त्री -कार्यकर्त्यांना आवर्जून बरोबर घेऊन जातात, ज्यामुळे शहरातल्यांची व खेड्यातल्यांची जनजागृती होते. अहंकारींचा मुलगा सध्या इंग्लंडात एका संशोधनवृत्तीवर काम करतोय, त्यावरून हा वसा पुढच्या पिढीतही जपला जात आहे त्याची धन्यता वाटते. जगन्नाथाच्या रथाला जसे जितकी माणसे ओढतील तितके ते दैवत सहजी विराजते, तसेच मानून सर्व सेवाभावी लोकांनी ह्या संस्थेला अवश्य मदत करावी. त्यांचा पत्ता आहे : हॅलो मेडिकल फौंडेशन, जानकी रुग्णालय, अणदूर, ता.तुळजापूर, जि.उस्मानाबाद--पिन कोड: ४१३६०३ ( महाराष्ट्र ) व ई-मेल : shashikant.hmf@gmail.com आणि संकेत-स्थळ आहे: www.halomedicalfoundation.org

-------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

-------------------------------------------------------

Saturday, November 12, 2011

अभिमान बाळगावा असे डॉ.अहंकारी
६ नोव्हेंबर २०११ ला औरंगाबादी "अनंत भालेराव-स्मृती-पुरस्कार" डॉ.शशिकांत अहंकारी ह्यांना देण्यात आला. डॉ.अहंकारी व त्यांच्या गायनॅकॉलॉजिस्ट पत्नी डॉ.शुभांगी अहंकारी हे दांपत्य, एका खेड्यात ( अणदूर, तुळजापूर तालुक्यात, उस्मानाबाद जिल्ह्यात, सोलापूर पासून ४० किमी वर हे खेडे आहे) एक अतिशय मोलाचे काम करीत आहेत त्याचा हा सन्मान आहे.
अणदूर ह्या खेड्यात अहंकारींनी हॅलो ( हेल्थ ऍंड ऍटो लर्निंग ओर्गनाइझेशन ) नावाची संस्था काढली आहे. सुरुवात त्यांच्या आईच्या नावे काढलेल्या "जानकी रुग्णालया"ने झाली व सध्या त्यांचा "भारत-वैद्य" नावाचा प्रकल्प सरकारनेही वाखाणला आहे. गावोगावच्या खेड्यापाड्यातून थोड्याशा ( इयत्ता ८ ते १२) शिकलेल्या स्त्रियांना ते एक महिन्याच्या प्रशिक्षणात प्राथमिक आरोग्याचे व विशेषत: माता-बाल-संगोपनाचे प्रशिक्षण देतात. ह्यांना ते "भारत-वैद्य" म्हणतात. मग ह्या भारत-वैद्य स्त्रिया त्यांच्या गावात घरोघरी जाऊन प्राथमिक आरोग्य-सेवा देतात. हे काहीसे चीनच्या बेअर-फुट डॉक्टर्स सारखेच आहे. ह्या मूलभूत प्रशिक्षणाला हलके लेखू नका. कारण ह्या मूलभूत ज्ञानामुळे लबाड डॉक्टरांची ह्या खेडवळ स्त्रिया कशी बोबडी वळवतात त्याचा एक किस्सा ऐका. एका मुलाच्या पोटात खूपच दुखत असते. प्राथमिक उपचाराने बरे वाटत नाही. मग शेजारीपाजार्‍यांच्या मदतीने ती भारत-वैद्य त्याला शहराच्या ठिकाणी घेऊन जाते. शहरातला डॉक्टर म्हणू लागतो ह्याच्या पोटात डावीकडे जे दुखते आहे ते ऍपेंडिक्स मुळे व ते फुटायच्या आत त्याचे ऑपरेशन करणे जरूरीचे आहे व त्याला साधारण दहा हजार खर्च येईल. भारत-वैद्य म्हणते की आम्हाला शिकवले आहे की ऍपेंडिक्स तर उजवीकडे असते तर मग हे दुखणे ऍपेंडिक्सचे कसे असेल ? त्या पोराचे दुखणे मग दुसर्‍या डॉक्टराकडून मिटवल्या जाते व लबाड डॉक्टरांची लबाडी एका प्राथमिक आरोग्याच्या शिक्षणाने उघडकीला येते.
डॉ. अहंकारींनी अतिशय कल्पकतेने "माता-दत्तक-योजना" तिथे राबवली आहे. वस्तीतल्यांच्या मदतीने तिथली भारत-वैद्य स्त्री गरोदर मातेला दत्तक घेते. तिने १२ आठवड्याच्या आत दवाखान्यात नाव नोंदवले का नाही, धनुर्वाताची तीन इंजेक्शने घेतली की नाही, शंभर लोहगोळ्या घेतल्या की नाही व योग्य आहार वेळच्या वेळी घेतला की नाही ही अगदी प्राथमिक आरोग्याची काळजी वाहते. ह्या जुजबी काळजीमुळे माता-बालक-मृत्यूचे प्रमाण घटते, व आयुष्याची सुरुवात नेमकी व विश्वासक होते. ह्यामुळेच सोलापूरच्या गरीब वस्त्यात ते ह्या चळवळीचे नाव "शुअर स्टार्ट" असे ठेवतात जे अतिशय चपखल असेच आहे.
स्त्री-भ्रूण-हत्या विरोधात काम करीत असताना डॉ. अहंकारी एक विदारक प्रसंग सांगतात, ज्यामुळे कोणाही पुरुषाला लाज वाटावी. त्यांची एक कार्यकर्ती असते. ती सरपंच म्हणून निवडून येते. नवर्‍याचा प्रथम पाठिंबा असतो. पण नंतर तिच्या कामामुळे तिचे जागोजागी सत्कार व्हायला लागतात. ते सहन न होऊन मग तो तिला मारहाण करायला लागतो. बाईला एके वेळी भर सभेत तिच्या पाठीवरचे वळ दाखवावे लागतात. ह्या पुरुषी अहंकारामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना आजही प्रचंड त्रास होतो. कदाचित ह्या पुरुषी अहंकाराची सतत जाणीव रहावी म्हणूनच स्वत: अगदी निर-अहंकारी आणि कोणीही अभिमान बाळगावा असे ते असूनही डॉक्टरांनी अहंकारी हे आडनाव अजूनही जपले असावे.
डॉ. अहंकारींच्या अनेक प्रकल्पांना नामवंत संस्थांचे पाठबळ मिळते आहे. त्यात ऑक्सफॅम, फोर्ड फौंडेशन, युनिसेफ, स्विस-एड, सिद्धिविनायक ट्रस्ट, महाराष्ट्र फौंडेशन, व पाथ ह्या सेवाभावी संस्था त्यांच्या प्रकल्पांचा मरातब वाढवतात. जगन्नाथाच्या रथाला जसे जितकी माणसे ओढतील तितके ते दैवत सहजी विराजेल, तसेच मानून लोकांनी ह्या संस्थेला अवश्य मदत करावी. त्यांचा पत्ता आहे : हॅलो मेडिकल फौंडेशन, जानकी रुग्णालय, अणदूर, ता.तुळजापूर, जि.उस्मानाबाद--पिन कोड: ४१३६०३ ( महाराष्ट्र ) व ई-मेल : shashikant.hmf@gmail.com आणि संकेत-स्थळ आहे: www.halomedicalfoundation.org

-------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

Tuesday, October 4, 2011

द भालेराव---१७
तब्येतीत हसणे !

आमच्या आईच्या दुखण्याचे एक मोठेच प्रकरण होते. ती होणार्‍या त्रासाचे नक्कीच इतरांना ऐकवी पण ते केवळ तुम्ही ऐका, एवढ्याच अपेक्षेने असायचे व त्यावर ती स्वत:ही हमेश: विनोदाने चेष्टा करायची. एकदा एका एम.डी.च्या विद्यार्थ्याला घेऊन ती मुंबईला आली होती. त्या विद्यार्थ्याच्या कोणी गाईड, सायन हॉस्पिटलच्या मेडिसिन विभागाच्या प्रमुख होत्या. त्याने माझ्या आईला त्यांना दाखवण्याचा घाट घातला होता. मीही बरोबर गेलो होतो. प्रमुख बाई पारशी होत्या. त्या टिपिकल पारशी मराठीत म्हणाल्या, हं सांगा हिस्ट्री ! त्यावर आमची आई म्हणाली कुठून सांगू ? त्या म्हणाल्या अगदी "पहिले पासनं". त्यावर आईनं विचारलं औषधांची हिस्ट्री सांगू का रोगांची. त्यावर त्या बाई हसल्या खर्‍या, पण आई घेत असलेली कित्येक औषधे इतिहासजमा झालेली होती हे ती हिस्ट्री सांगत असताना माझ्या ध्यानात आले.
असेच आमच्या वडिलांचे केईएम मध्ये थायमेक्टोमीचे ऑपरेशन झाले तेव्हा सगळ्यांचे लक्ष त्यांच्या तब्येतीकडेच असायचे व ते साहजिकच होते. पण आईला आपल्याच तब्येतीचे असलेले कौतुक स्वस्थ बसू देत नसे. एकदा सकाळी हॉस्पिटलला जाताना ती म्हणू लागली की खरं म्हणजे तिचीच तब्येत काळजीची आहे. वडिलांचे काय फक्त ऑपरेशनच तर आहे. पण तिची तब्येत किती बेभरवशाची . त्यावर मग मी म्हटलं की आज आपण जरा लवकर आलो आहोत तर समोरच्या हॉटेलात नाश्ता घेऊ व त्यावेळेस तू तुझ्या तब्येतीचे सवीस्तर सांग, मग तसे दाखवू. ह्यात स्वत:च्या तब्येतीचे कौतुक जितके होते तेव्हढेच एक खेळकरपणे त्या त्रासाचे झेलणे होते. नंतर वडिलांची तब्येत जरा काळजीची झाली तेव्हा सगळ्या डॉक्टरांसमोरही तिने हेच म्हटले की तिचीच तब्येत ज्यास्त काळजीची आहे, तेव्हा खोलीतले टेंशन तिच्या ह्या खेळकर तक्रारीने एकदम उतरले होते.
सगळ्या तपासण्या झाल्या की सगळेच डॉक्टर तिच्या क्रॉनिक डिसेंट्रीची "मानसिक" म्हणून बोळवण करीत. ती स्वत:ही जितके डिसेंट्रीचे लाड करायची तितकीच खेळकरपणे त्याचे टेंशन घालवण्यासाठी म्हणायची "आजचा स्कोअर दोन आकडी झालाय !" तिच्या तब्येतीच्या कौतुकाची परमावधी म्हणता येईल असा प्रसंग हैद्राबादी मी दुसरीत असताना झाला होता. हैद्राबादचे आरोग्यमंत्री असलेले डॉ.मेलकोटे आमच्या वडिलांच्या फार परिचयाचे होते. त्यांचे एक सॅनेटोरियम शहरातच होते. त्यांना तब्येत दाखवल्यावर त्यांनी आईला सॅनेटोरियममध्येच दाखल करून घेतले होते. इतके अलिशान सॅनेटोरियम होते की एक प्रशस्त बंगलाच आमच्या आईला देण्यात आला होता. नर्सेस, डॉक्टर सदैव तैनातीत असायचे. मी शाळा सुटली की सायकलने तिचा जेवणाचा डबा घेऊन यायचो. त्यावेळी मला सायकलच्या सीटवर बसता येत नसे. मी तेव्हा सायकल-कैंचीतच चालवायचो. सॅनेटोरियमच्या निवांतपणाचा मला असा फायदा झाला की तिथल्या प्रशस्त आवारात मी सीटवरनं सायकल चालवायला शिकलो. चांगले महिना दीड महिना आईने सॅनेटोरियमचा पाहुणचार घेतला होता. त्याच दरम्यान जवाहरलाल नेहरूंनी त्या सॅनेटोरियमला भेट दिली होती व मी त्यांना तिथलेच गुलाबाचे फूल दिले होते. डॉक्टर मेलकोटेंसारखेच जवाहरलालही एकदम लालबुंद गोरे होते. त्या दरम्यान ती दुखण्याचे कमी व सॅनेटोरियमचे कौतुक सगळ्यांना हटकून सांगायची.
एखाद्या व्याधीवर हसणे, त्याची चेष्टा करणे हा माणसाचा जणू स्वभावच होऊन जात असावा. आई स्वत:च्या त्रासाचे जितके कौतुक करायची किंवा करवून घ्यायची त्याहीपेक्षा त्याची चेष्टा उडवणे हे तिच्या अंगवळणीच पडले होते. शेवटी शेवटी तिला विस्मरणाचा त्रास होतोय असे अशोक सांगे. मी एकदा त्याला विचारले की म्हणजे काय म्हणते ती ? तर सांगायला लागला की तिच्या खोलीत कोणी नसले की जोराने ती हाका मारी. कोणी दाद नाही दिली तर मोठ्याने "अशोक अनंतराव भालेराव" अशी सबंध नावाने हाका मारी. त्यावर अशोकने तिला सांगायचा प्रयत्न केला, की असं बरं नाही, लोकं नावं ठेवतात. त्यावर तिनं विचारलं की कोण नावं ठेवतात. बापू काळदाते शेजारीच असतात. अशोकने त्यांचे नाव सांगताच आई म्हणाली म्हणे की अं, त्यांचं काय एवढं, आपणच तर त्यांना औरंगाबादला आणलंय, त्यांचं सगळं केलंय त्यावेळी ! अशोक हे तिच्या विस्मरणाचे म्हणून सांगत होता व ते मला तिच्या कणखरपणाचे, हसून टाळण्याचे वाटत होते.
प्रकाश चिटगोपीकराचेही असेच हसून निभावणे मोठे मजेशीर होते. त्याची जे.जे.त शस्त्रक्रिया झाल्यानंतर आम्ही त्याच्या विचारपूशीला गेलो तेव्हा त्याने छातीत येणार्‍या कळीचे जे बहारदार वर्णन केले होते, त्यावरून ते दुखणे की त्याची टर असेच कोणाला वाटावे. नागनाथराव परांजपे हे सुद्धा स्वत:ला फार जपत. थोडीही सर्दी झाली की डोक्याला टॉवेल वगैरे गुंडाळीत, पांघरूण घेत. व वर म्हणत की बाबा हे शरीर ह्या राष्ट्राची संपत्ती आहे ! दुखणे हे कौतुक करूनही न जाणारे झाले की माणूस मग त्याची हसूनच जिरवायचा प्रयत्न करतो तो असा ! ह्यात त्या दु:खाला सहानुभूती मिळवण्यापेक्षा त्यावर हसणेच हा माणसाचा स्वभाव होतो !
---------------------------------------------------------------------------

Friday, April 29, 2011

द भालेराव-----१६
प्रदीपचे जल-निर्वाण !
आयुष्याचे मोठे गमतीचे असते. ते असते तेव्हा जाणवत नाही व नसते तेव्हा ते ताणवत रहावे असे वाटत राहते.
प्रकाश चिटगोपेकरचा भाऊ व तितकाच दुसर्‍या टोकाचे व्यक्तिमत्व असलेला प्रदीप चिटगोपेकर गेला, तेव्हा त्याचे हे जल-निर्वाण अकालीच झाले असे वाटले. बदलापूरच्या स्मृति-गंधच्या मेळाव्यात आपण त्याचा सत्कार करतोकाय, त्याच्या "जल-संवाद" ह्या मासिकाबद्दल अचंबित होतो काय आणि एक वर्ष होत नाही तोच, त्याच्या नसण्याची हळहळ जाणवावी, ही काळाची अगाध करणीच म्हणावी लागेल.
व्यक्तिमत्वांची खरी ओळख बर्‍याचदा फसवी असते, हेच जणु, प्रकाश व प्रदीप ह्यांनी जाणवून दिले आहे. प्रकाश चिटगोपेकर दिसायला जितका मनमुराद, उन्मुक्त वाटायचा, तितकाच तीव्र चिकाटीचा निघाला. सलमान खानचा जो डायलॉग आजकाल प्रसिद्ध आहे ( जब मै एकबार कमिट करता हूं तो फिर मै खुदकी भी नही सुनता ), त्याची आठवण करून देणारी त्याची ही चिकाटी होती. सत्तेच्या राजकारणाला कोणीही चिकटून राहू शकतो. कारण त्यात फायदेच असतात. पण कायम विरोधकांबरोबर राहणे, त्या कमिटमेंटचे सर्व धोके सहन करणे ह्याला पराकाष्ठेची चिकाटी लागते. प्रकाशने ते धारिष्ट्य शेवटपर्यंत प्राणपणाने जपले होते. प्रदीपही त्याच चिकाटीचा निघाला . ती जशी प्रकाशकडे होती तशीच चिकाटी प्रदीपनेही दाखवली, ती त्याच्या "जल-संवाद" ह्या मासिकावरून व ते नेटाने चालवण्यावरून.
आपण पाण्याचे महत्व नुसते निबंधापुरते वाखाणतो. त्याला जीवन म्हणतो. पण पाणी व तत्सम प्रश्नांकडे कायमच दुय्यम महत्व देतो. पण त्यालाच शिरोधार्य ठरवीत, त्यावर, केवळ पाणी-प्रश्नावर, एक मासिक चालवणे हे फारच जगावेगळे धाडस होते. बरे त्याच्या सौम्य व्यक्तिमत्वाच्या अगदी विरोधी गुणांचे हे काम होते. तरीही त्याने ते चिकाटीने रेटले आणि हेच फार कौतुकास्पद आहे.
माझे वडील वारले तेव्हा त्यांच्या स्मरणार्थ शिऊरच्या मंदीराला काही देणगी द्यावी, असे मी मनात योजत होतो. अनायासे शिऊरहून काही वारकरीही आलेले होते. मी त्यांना तसे बोलून दाखवले. त्यावर त्या खेडवळ माणसाने जे सांगितले तो माझ्या समजूतीने "श्रद्धांजली कशी अर्पण करावी" ह्याचा श्रेष्ठ पाठच होतो. त्याने विचारले होते की तुम्हाला असे का वाटते ? त्यावर मी स्पष्ट केले की माझ्या वडिलांची वारकरी संप्रदायाप्रती अपार श्रद्धा होती व त्या मार्गावर त्यांचा लोभ होता, असे मला त्यांचे काही लिखाण वाचून वाटते. ह्यावर तो खेडुत म्हणाला होता, मग तुम्हाला त्यांच्याबद्दल तसे काही करावे असे वाटतेय तर तुम्ही वारकर्‍यांबद्दल, त्यांच्या भक्तिमार्गाबद्दल जातीने काही वाचा, अनुभवा. तीच मोठी श्रद्धांजली होईल. त्यानंतरच मी तुकाराम, ज्ञानेश्वर वगैरे संतसाहित्याचा अभ्यास करण्याचे ठरविले व अजून ते चालू आहे.
ह्याच दृष्टीने प्रदीपला खरी श्रद्धांजली द्यायची, तर पाण्यासंबंधी काही लिहावे असे ठरवून सध्या जगात पाण्यावर जे संशोधन चालू आहे त्याचा मागोवा घेणारा एक लेख मी तयार करीत आहे. त्यातली एकच गोष्ट इथे नमूद करतो. आपल्याकडे बच्चाबच्चा जाणतो की पाण्याची रासायनिक संज्ञा "एच-टू-ओ" ( H2 O ) अशी आहे. पैकीच्या पैकी मार्कांसाठी, आपण घोकतो की हायड्रोजनचे दोन अणू व ऑक्सिजनचा एक अणू, अशा संयोगाने पाणी तयार होते. हेच आपण कितीही ज्यास्त शिकलो तरी मानत जातो. पण संशोधक म्हणतात, ह्यातले हायड्रोजनचे दोन अणु हे पक्के दोन नसून थोडे कमी आहेत. जसे: १.९ . आहे की नाही आपल्या समजूतीला धक्का देणारे. अशाच काही गोष्टी ह्या निमित्त मी गोळा केल्या आहेत.
हा लेखच माझी प्रदीप चिटगोपीकरच्या जल-निर्वाणाला खरी श्रद्धांजली आहे ! त्याच्या कुटुंबियांना त्याच्याशिवाय जगताना बळ मिळो हीच प्रार्थना !

----अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

Thursday, March 10, 2011

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

द भालेराव---१५

हे भगवान !
अगदी सरळ स्वभाव, सर्वांशी हसतमुख, सगळे काम बिनबोभाट, आणि कधी कशाबद्दल पराकोटीचा राग नाही, असे सगळे सदगुण असतानाही काळाने मोटार अपघातात, नेमके भगवान धामणगावकरलाच उचलून न्यावे हे काही तरी गौड-बंगालच म्हणावे लागेल.
भगवान हे नाव आताशी कोणाचे ऐकू येत नाही. ते जरी असे जुन्या वळणाचे असले, तरी त्यातून भगवानाचेच निरनिराळे पैलू म्हणता येतील असे भाव त्याच्या वागण्या-बोलण्यातून दिसत असत. तो जेव्हा प्रथम मुंबईला माझ्याकडे आला होता, तेव्हा तर त्याची वाईट परिस्थितीची खडतर अशी परिक्षाच चाललेली होती. नोकरीचा शोध, पैशांची चणचण, आणि ओळखीचे कोणी नाही, असे चोहोबाजूने कोंडणारे दिवस होते. त्यात चार विरंगुळ्याचे क्षण तेव्हढेच काय ते मी देऊ शकलो असेन, पण त्याने ते क्षण कायमचे बोलून दाखवून मानाचे केले. तो येई तेव्हा योगायोगाने जेवणात भेंडीची भाजी असे, त्यावरून माझ्या मुलांनी त्याचे टोपण नावच भेंडी-भगवान असे केले होते. आता भेंडीची भाजी तशी होणे नाही. आताशा डॉक्टर गुरशानींच्या शाळेच्या कामाच्या व्यापात त्याचे वेगळेच धीर-गंभीर पण शांत रूप दिलासा देणारे होते. त्यातही सायबर-लॉची पदवी घेऊन त्यात काम करण्याची व शाळेत संगणकाचा ज्यास्तीत ज्यास्त उपयोग करण्याची त्याची अद्ययावत दृष्टी वाखाणण्यासारखी होती. म्हणूनच तर त्याला आवडेल असा हा ई-श्रद्धांजलीचा प्रयत्न आहे .
रूढ रीतीप्रमाणे पैसा-अडका, घरबार, गाडीघोडा, मानमरातब, हे सगळे त्याला माफक प्रमाणात मिळालेच होते. त्यासाठी त्याचे प्रचंड प्रयत्न करून झाले होते. पण ह्या पलीकडे महत्वाचे मानून त्याने माणसे जोडली, त्यांचा लोकसंग्रह प्रयत्नाने केला. आजकाल अनंत भालेराव प्रतिष्ठानचे कामही तो बर्‍याच उत्साहाने करताना दिसत होता. नातेवाईक व मित्रांशी नेहमीचा प्रेमळ सलोखा तर कायमचाच दिसणारा होता. सालसपणाचे तो एक आदर्श उदाहरणच होता इतके त्याचे व्यक्तिमत्व भावणारे होते.
त्याला जोडीदारीणही तशीच सरळ, मृदू स्वभावाची मिळाली होती. त्याच्या मुलाबरोबर तो लहान असताना मला चार पाच वेळा चांगलेच खेळायला मिळाले होते. आता त्याच मुलाचे लग्न ठरवून तो घरी परतत होता हे ऐकून किती मोठ्ठा काळ कसा पटकन लोटला त्याचे भान येते. माणसाचे क्षणभंगुर जगणे संपले तरी इतर जगाला रहाटीत फिरतच राहावे लागते. ह्या कालचक्राच्या फिरण्यात, त्याच्या पत्नीला आणि मुलांना त्याच्या पश्चात जीवन रेटण्याची शक्ती मिळो, उभारी येवो हीच प्रार्थना.

-------अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com


-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Tuesday, January 11, 2011

द भालेराव---१४
माते समान ? मातेस मान ?
आपण बरीच वर्षे साने गुरुजींच्या श्यामच्या आईतले "श्याम" असतो. ( आपल्या बायकांना तर आपण कायमच ममाज बॉय आहोत असे खात्रीने वाटत असते ! ). इतके आईचे ऋण असते. पण आयांना मात्र आपले लग्न झाल्यावर आपल्याला बिघडवण्यात आले आहे असे वाटतच असते. आईचे शेवटचे दिवस पाहताना सर्वांनाच क्लेश होतात.
आईचे महिमे जरी आपण गायले नाहीत, तरी आपण शक्यतो तिला नावेही ठेवत नाही. आईच्या "ह्रदयाने" माझ्या मुलीला दुसरीत असताना जाम शिक्षा झाली होती. तिच्या पुस्तकात एक भावविवश करणारा धडा होता. एक मुलगा आईचा खूप लाडका असतो. पण तो हटटीही असतो. एकदा त्याला आईचे ह्रदय हवे असते. तो अडूनच बसतो. आई मग त्याला आपले ह्रदय काढून देते. तो ते घेऊन धावत सुटतो. अडखळून पडतो. आईचे ह्रदय खाली पडते, व ते कळवळत म्हणते की "बाळा तुला लागले तर नाही ना ?" शिक्षक अगदी भावनावेगाने सर्व चित्र नाट्यमय करीत होते. तेव्हढ्यात माझी दुसरीतली मुलगी जोरात हसली व वर्गाचा रसभंग झाला. तिला शिक्षा झाली. मी जेव्हा तिला सौम्यपणे काय झाले व तू का हसलीस असे विचारले. तेव्हा ती म्हणाली की पडलेले काळीज बोलतेय, ते कसे बोलले असेल, ह्याचा तिला विस्मय पडला व हसू आले. पिढयानपिढया ह्या धडयावर रडलेल्या आहेत पण आताशी मुले त्यावर हसतात ! आईच्या ह्रदयाला आजकाल असे दिवस आले आहेत !
माझा धाकटा भाऊ त्याच्या मुलींशी ( वय ८-१० ), एक गमतीचा खेळ खेळे. तो म्हणे, आपण आई वडील बदलूयात का ? आई बदलायची तर कोणती नवीन घ्यायची ? प्रथम मुलींच्या खर्‍या आईविषयी तक्रारी असायच्या. पण बदलून दुसरी आई निवडताना आजूबाजूच्या बायकांपैकी त्यांना एकदोघी पहिल्यांदा चांगल्या वाटायच्या. नंतर त्यांच्याही खोडया खटकायच्या. अशा बायका बदलत बदलत पोरी ह्या निर्णयाला यायच्या की जाऊ द्या, आहे ती आईच राहू द्या, तीच बरी आहे. शिवाजी महाराजांसमोर जेव्हा कल्याणच्या सुभेदाराची सून, जी अतिशय सुंदर होती, उभी करण्यात आली तेव्हा त्यांनाही क्षणभर असेच वाटले ना की ही आमची आई असती तर ? इथे बर्‍याच जणांना असा प्रश्न पडतो की आपणही हिच्या इतके सुंदर झालो असतो, असे वाटणे, म्हणजे खर्‍या आईचा एक प्रकारे अवमानच होत नाही का ? जरा कोडयातच पडतो आपण. पण ते असलेल्या आईला सारून, केवळ दिसण्यावरून, ह्या बाईला आईचा दर्जा देत आहेत हेही नक्कीच. अर्थात त्यांनी तिला नंतर मानाने रवाना केले त्यावरून त्यांचे सदवर्तन दिसतेच. पण खरी आई हिच्या इतकी सुंदर नव्हती, ही तुलना तर झालीच की ! आम्हा चार भावंडात मी लाडका होतो म्हणजे बाकीच्यांचा दुस्वास होत होता असे नसते. तसेच ही सुंदर बाई आई असती तर, असे वाटण्याने असलेल्या आईचा अवमान कसा ? एकीचा मान म्हणजे दुसरीचा अवमान असे गणित जरा दांडगाईचेच होते. पूर्वी कित्येकांना दोन आया असत. एक आई व एक मोठी आई. मी अशी मुले पाहिलेली आहेत. ती सख्या आई एवढेच सावत्र आईशीही चांगली वागत. वेळप्रसंगी सावत्र आईशी चांगले वागले तर ते खर्‍या आईशी वाईट वागणे होत नाही !
मातेस मान ( मातेला मान ), हे दोन शब्द माते-समान असेही लिहू शकतो. म्हणजे लिहिण्यावरून तरी दुसर्‍या एखाद्या बाईला माते समान लेखले, तसा मान दिला, तर त्याचा अर्थ मातेस मान दिला नाही असे होत नाही. माते-समान हे मातेस मान च आहे ! ह्यात खरी माता किंवा माता ह्या कल्पनेस मान दिला असेही होते !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com


The Bhalerao---14


Mother's Honour !

Whether we turn out to be a "good boy" / "good girl" or not, we always deem our mothers to be good. Though occasionaly we disagree with our mothers and fight with them often, we mostly agree that they are good mothers. ( It is another thing that wives rate us as "Mama's boy" for this mother's love ! )
This must be because they have such a nice "mothers' heart !"
But this same "mother's heart" had brought my daughter to trouble in the school , when she was in second grade. It so happened that teacher was teaching a very emotional lesson about "mother's heart". The story was narrating that this boy was the darling of his mother. But he was very adamant also sometimes. Once he wanted to see "heart". To appease him, mother takes out her heart and hands it over to him. With mother's heart in his hands he starts running around the house. He stumbles on something and falls down. Mother's heart while getting the fall asks him "Are you hurt my son ?". While the teacher was at his best in dramatizing the climax, my daughter laughed aloud and was eventually punished in the class. When she got home, I asked her, very sympathetically as to why she laughed ? Her answer made me laugh too. She said, she found the fallen heart talking in mother's tone, a very funny sight ! For generations we had cried on this situation in the story of mother's heart but nowadays these children find the sight funny !
My younger brother used to play a novel game with his daughters when they were about 8/10 years old. They used to have usual complaints about their mother and my brother then used to say "OK, let us change mother !" And then, they would discuss various ladies in the neighbourhood as replacement mothers. Initially they would get enamoured by the gorgeous ladies but would discover some irritating aspect of theirs and discard them, one by one. Ultimately they would settle on the existing mother and would decide to tolerate her some more.
There is very famous episode in History about Shivaji . Once when his army takes over a province called Kalyan they fetch the daughter-in-law of the Sardar of Kalyan, alongwith the loot. This lady was very beutifull. Upon seeing her beauty, Shivaji said that he wished his mother was as beautifull and then he also would have turned out with better looks. Now many people feel that though this incident shows honouring the lady, it means a little belittling his own mother. But saying someone beautifull does not mean other one is not beautifull. Especially in the family if one of the siblings is the fondest one of mother, it does not mean others are less dear. In the same vein, saying that the other lady is beautifull, should not mean disrespect to own mother. This is not a "zero-sum" compliment so that honour to one should mean dis-honour to the other. Many children do have a step-mother and invariably the stepmother would be the younger and more beautifull one. And if the child obeys the stepmother then it should not mean disobeying the real mother.
In fact, when one honours a step mother, one is really honouring the mother hood and it should not be taken as a match between the real mother and the stepmother ! So, Shivaji did not mean any disrespect to the real mother when he considers some other lady in place of the mother !

Monday, December 27, 2010

द भालेराव---१४
केशवराव देशपांडे---मराठवाडयाचे साने गुरुजी !
दिलशाद टॉकीज हैदराबादची सुलतानबाजारातली गजबजलेल्या वस्तीतली टॉकीज. मॅनेजरच्या खोलीला त्याकाळातले प्रसिद्ध अर्धे स्प्रिंगचे दार. त्यात मला ( वय वर्षे १०) खालून केशवराव काका खुर्चीत बसलेले दिसले. मागून माझे काका लोक मला ढोसत होते की आत जा व चिठ्ठी दाखव. वडिलांनी चिठ्ठी दिलेली होती, "मुले सिनेमाला येत आहेत, कृपया त्यांना सोडावे !" सिनेमाला चिक्कार गर्दी. लोकांची मॅनेजरच्या खोलीत चांगलीच वर्दळ, मागाहून माझ्या काका मंडळींचे ढकलणे. मी कसाबसा आत जातो. काही न बोलता केशवराव काकांच्या हातात चिठ्ठी देतो. ते म्हणतात, "अरुण ना तू. थांब हा थोडं, किती जण आहात ? " मग बराच वेळ आम्ही बाहेर थांबतो. मधनं मधनं आतून कळत राहते की इंडियन न्यूज रिव्ह्यू सुरू झालाय, गर्दीची वर्दळ वाढतेय, आमची चलबिचल. तेव्हढ्यात केशवरावकाकांचे बोलावणे येते, एका माणसाबरोबर ते आम्हाला आत सोडतात. हुश्श ! सिनेमा सापडला ! खरे तर चिठ्ठीने फुकट सिनेमा पाहतोय ह्याचे आम्हालाच कानकोंडे वाटत असायचे पण केशवरावकाका सर्व परिस्थिती जाणून अतिशय मृदू हाताळणीने काहीही दडपण आमच्यावर येऊ द्यायचे नाहीत. दुसर्‍याचा इतका विचार करणारे लोक खरच विरळा !
त्यानंतर ते मराठवाड्यातच आले. पैशाचे सर्व व्यवहार त्यांच्याकडे असत. आमच्याकडे घरी पैशाची कायमच चणचण व आणिबाणीचे प्रसंग सारखे येत. मग वडिलांना हातउसने उचल घ्यावी लागे. कित्येकवेळा आमची आईसुद्धा केशवरावकाकांना शब्द टाकायची. सगळ्यांचीच ओढाताण असायची. त्यात केशवरावकाकांना खरे तर कडक होणे व पैसे नाकारणे काही जड गेले नसते. पण त्यांचा स्वभाव इतका मुलायम व संवेदनशील की ते पैसे मागणार्‍या आम्हा मंडळींना कधीही हिडीसफिडीस किंवा कमी लेखत नसत. हे फार मोठ्या मनाचे लक्षण आहे हे आता क्षणोक्षणी ध्यानात येते. म्हणूनच तर मला ते नेहमी मराठवाड्याचे साने गुरुजीच वाटत आले आहेत.
मी तर त्या काळात वडिलांबरोबर त्यांच्या भावाकडेही दादरला जात असे. तेही खूप माया करीत. सर्व कुटुंबच मोठे मृदु स्वभावाचे व परोपकारी वागणारे. मराठवाड्यात कित्येक वेळा वादळी चर्चा होत, बोलाचाली होई. पण मी कधीही केशवरावकाकांना त्यांचा मृदूपणा सोडलेले पाहिले नाही. इतका सोज्वळ मृदू स्वभाव सर्व परिस्थितीवर मात करीत नजरेत भरून राही.
जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला, असे साने गुरुजींचे वचन आहे, ते खास केशवरावकाकांसाठीच जणुं केले असे वाटते. मराठवाड्याच्या ह्या साने गुरुजींच्या आत्म्यास शांती मिळो, कुटुंबियास त्यांच्या पश्चात कालक्रमणा करतांना धैर्य मिळो, हीच ईच्छा !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

Wednesday, December 15, 2010

मोनालिसाचे कोड !
चित्रकलेच्या जगात मोनालीसा ह्या लिओनार्डो-दा-व्हिन्सी च्या चित्राचे खूपच कोडकौतुक झालेले आहे, होतही आहे. त्यावर नुकतेच गाजलेल्या "दा व्हिन्सी कोड" कादंबरीत भलभलते अर्थांचे इमले चढवलेलेही आपण पाहिले. इतके करूनही मूळ जिज्ञासा तशीच राहते की कोण असेल ही बाई व ती काय सांगत असेल बरे ?
तर चित्रकलेतले संशोधक अव्याहतपणे हा ध्यास बाळगून राहतात व निरनिराळे तर्क लढवतात. असाच एक नुकताच प्रसिद्ध झालेला तर्क आहे की मोनालीसाच्या चित्रात तिच्या डोळ्यात म्हणे बारीक बारीक अक्षरे दिसली, जी एक प्रकारे ह्या चित्राचा संदेश वा कोड ( गुप्त संदेश) असावा. डोळ्यात सूक्ष्मदर्शक भिंगाने म्हणे काही अक्षरे दिसली आहेत. एका डोळ्यात दिसलीत : एल व्ही. तर तज्ज्ञांचे म्हणणे की ही असावीत लिओनार्डो व्हिन्सी ची आद्याक्षरे. दुसर्‍या डोळ्यात दिसताहेत : सी, ई किंवा बी. तर काही जणांना ती दिसताहेत 72 किंवा एल व 2 अशी. आता ह्याचा मात्र काही बोध होत नाहीय.
चित्रकलेत चित्रकाराने आपले नाव चितारणे आज तरी सार्वत्रिक आहे. काही काही चित्रकारांच्या फर्ड्या सह्या तर त्यांच्या चित्रांपेक्षाही ज्यास्त बहारदार वाटतात. शिवाय आपण बर्‍याच सहलीच्या ठिकाणी असलेल्या रेघोट्या ( जसे रमेश लव्हज सीमा वगैरे ) पाहतो त्यावरून चित्रकाराला आपले नाव लिहिण्याची उबळ येणे हे ज्यास्त साहजिक वाटते. तेव्हा एल व्ही हे चित्रकाराचे नाव असूही शकेल. पण बाकीचे 72, एल 2, किंवा बी ह्यांचे काय कोड असेल ?
चित्रकलेत पोर्ट्रेट ह्या चित्रांना नावे देण्याची प्रथा नाहीय. शिवाय पूर्वी व अजूनही कित्येक पोर्ट्रेटस ही व्यावसायिक मॉडेलस ना पुढे ठेवून काढलेली असतात. जे.जे. स्कूल मध्ये तर असे ऐकले आहे की नग्न चित्रे काढण्यासाठी तशा मॉडेल्सही असतात. पण त्यांची नावे देण्याचे चित्रकाराला प्रयोजन नसते. ( त्यांना पैसे ठरल्याप्रमाणे दिले तरी पुरेसे असते.). तेव्हा दुसर्‍या डोळ्यातली अक्षरे ही काही त्या चित्रातल्या व्यक्तीचे नाव नसणार. काही जणांचा तर कयास आहे की समलिंगी संभोग करणार्‍या दा व्हिन्सीने एखाद्या छक्क्याचेच हे चित्र काढलेले असणे ज्यास्त संबवनीय आहे.
आजकाल चित्रांना नावे देण्याची प्रथा आहे. जसे हुसेनने काढलेल्या एका नागड्या बाईच्या चित्राला त्याने सरस्वती असे नाव दिलेले आहे. पूर्वीच्या चित्रात प्रसिद्ध नाव आहे "द लास्ट सपर" किंवा "मेरी". तसे हे चित्राचे शीर्षक नसावे.
टॉलस्टॉयने पूर्ण आयुष्यभर कला म्हणजे काय व ती का असते त्याचा पाठपुरावा केला. त्याला वाटले की कला म्हणजे भावनेची परिपूर्ण उत्क्रांती असते, आणि कला सगळ्यांना उपलब्ध असून ती माणसाला उच्च अनुभव देते. आजकालचे चित्रकार जी व जशी चित्रे काढतात व त्यांना नावे देतात त्यावरून तर वेगळाच संशय येतो की हे काही खरे नसावे. पूर्वी जसे संस्कृतमध्ये निरनिराळे न्याय असायचे ( जसे काकतालीन्याय---म्हणजे टाळी वाजवायला व त्यात कावळा सापडायला एकच वेळ व्हावी, किंवा अंधहस्तीन्याय--म्हणजे सात अंधळ्यांना हत्तीची वेगवेगळी रूपे जाणवावीत व तीच म्हणजे हत्ती असे त्यांना वाटावे वगैरे ) त्याप्रमाणे हा एक घूणाक्षरन्याय असेल. म्हणजे एखाद्या किड्याने लाकडात कोरावे व ती नक्षी आपल्याला अक्षर वाटावे. ( असे व्यवहारात प्रत्यही घडते. उदा: ईदच्या बकर्‍यावर अल्ला अशी अक्षरे उमटलेली भासावीत किंवा पावसाने डागाळलेल्या भिंतीवर साईबाबाचे चित्र दिसावे. )
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

arunoday zala----13

Monalisa's new code !

The portrait of Monalisa by Leonardo-da-Vinci is a very pampered piece of art and it continues to draw imagination of the critics and researchers. In the recent famous novel of "Da Vinci Code" it has stretched all meanings to its maximum and still people keep researching meaning beyond what appears in the portrait.
While looking for meaning and code of this famous portrait in the Louvre in Paris the researchers have looked for a new code in the eyes of the portrait. They have found very minute letters in her eyes and they feel that this could be the code. With modern magnifiers they have found in one eye, letters : L, V. This they presume could be the initials of the artist Leonardo-da-Vinci. And in the other eye they have found letters: C and E or B or number 72 or L and 2. They are still deciphering these letters.
What code these letters must be containing ?
The presumption of L V being initials of the artist seems quite plausible. We still this tendency among the juveniles when they scribble "Ramesh Loves Seema" or some such names when we visit most of the historical places. And this seems to ba tradition also amongst most of the modern artists by putting their signatures in the paintings. In fact some of the artist's signatures look more impressive than their paintings.
Some of the artist do give titles to their paintings. For example the famous painting of M.F.Hussein of a naked lady bears the name of Saraswati, the Hindu Goddess. ( And because of such paintings Hussein has preferred Qatar to India ).Even in the oldern days we had titles like "the last supper" or "Mary" for the famous paintings.
But it seems unlikely that portraits are given titles. Most of the famous portraits don't have their person's names. In fact it is said that even now they employ professional models at JJ School of Art for portraits and nudes. They need not be given names . ( If they pay as per terms , it should be enough !).
What could be the meaning of these letters then ? Tolstoy had wondered, throughout his life, as to what could be the meaning of Art and what does it do ? He attempted to say "the evolution of feeling proceeds by means of Art; art is accessible to all men ; art and only art can cause violence to be set aside !"
But it also could be, as explained in some old Sanskrit scriputures by name "Nyaya". The famous examples are : say- "andh-hasti-nyaya" meaning seven blind men feeling an elephant and believing that as the reality or "kak-tali-nyay" meaning that by chance you should catch a crow in your hands while you were just clapping hands. They also have another variety called Ghoonakshar-nyaya, meaning a worm boring in the wood should appear as some design and it should appear as letters to us.
We are replete with incidents in actual life when this happens. It happens when we notice that the sacrificial sheep at the time of Eid is found to have some letters looking like "Allah" or on a rain soaked wall suddenly throws up a picture looking like Sai-Baba.
So the code could be just some worm's doing ?

Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com